Baramati News : बारामतीमध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना जय पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना जय पवार म्हणाले की, लोकांची मागणी आहे की मी 2029 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझ्या मनात आहे की मी पक्षाचं छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहावं.
अजित पवारांच्या अपघात अहवालाविषयी बोलताना ते म्हणाले की,'अपघातासंदर्भात अहवाल यायला एक वर्ष लागणार आहे. तपास लवकरात लवकर करावा याची मागणी आम्ही वेगळेवेगळ्या यंत्रणांकडे करतोय. सीआयडीची टीम देखील चांगलं काम करत आहे. आमचा संपर्क त्यांच्याशी आहे.'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे ते त्यात लक्ष घालतील. अपघाता संदर्भात जोपर्यंत खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत घातपात की अपघात, हे स्पष्ट होणार नाही. मी लोकांची दिशाभूल करणार नाही. आपण तोपर्यंत थांबूया जोपर्यंत कारवाई होत नाही. सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत, असे देखील जय पवार यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. उमदेवार सुनेत्रा पवार यांनी बूथ क्रमांक 233 काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. पार्थ पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. अजित पवारांच्या पश्चात ही बारामतीमध्ये ही पहिल निवडणूक असल्याने किती टक्के मतदान होणार याची उत्सुकता असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.