Baramati bypoll update : बारामतीत मतदानासाठी येणार नाहीत शरद पवार; सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया आली समोर...

Sharad Pawar voting news, Sunetra Pawar reaction : Sharad Pawar voting news, Sunetra Pawar reactionशरद पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले होते की, पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
Sharad Pawar voting news, Sunetra Pawar reaction
Sharad Pawar voting news, Sunetra Pawar reactionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra by-election news : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २३) मतदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मात्र मतदानाला येणार नाही. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनीच सोशल मीडियात पोस्ट करत मंगळवारी ही माहिती दिली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रमुख पक्षाचा उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे ही लढत एकतर्फी ठरली आहे. असे असूनही मताधिक्य किती असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी शरद पवार मतदानाला येणार नसले तरी त्यांचे आशीर्वाद लाखमोलाचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत.

Sharad Pawar voting news, Sunetra Pawar reaction
Maharashtra Government : फडणवीस सरकारकडून शिक्षकांना खूशखबर : मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली. आदरणीय साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. बारामतीची जनता विकासाच्या विचारांशी जोडलेली आहे आणि तीच दिशा पुढेही कायम राहील. आदरणीय साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना, असे सुनेत्रा पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले होते की, पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो.

Sharad Pawar voting news, Sunetra Pawar reaction
Ex CJI Bhushan Gavai News : माजी CJI गवई यांचा बागेश्वर धाममधील फोटो व्हायरल; एक शब्दही न बोलता प्रकाश आंबेडकरांनी असा साधला निशाणा...

आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असेही शरद पवारांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com