Jay Pawar_Ajit Pawar 
पुणे

Jay Pawar: रोहित पवारांनंतर आता जय पवारही मैदानात! अजित पवारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या VSR विमान कंपनीबाबत करणार मोठा खुलासा

Jay Pawar: राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक शंका उपस्थित करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता खुद्द अजित पवारांचे कनिष्ठ चिरंजीव जय पवार हे देखील मैदानात उतरले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Jay Pawar will take press conference about VSR Company : राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक शंका उपस्थित करणारे शरद पवारांच्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता खुद्द अजित पवारांचे कनिष्ठ चिरंजीव जय पवार हे देखील मैदानात उतरले आहेत. आपल्या वडिलांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या VSR विमान कंपनीबाबत आता जय पवार मोठा खुलासा करणार आहेत. सोमवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळं जय पवारांकडं नेमकी कुठली खळबळजनक माहिती उपलब्ध झाली आहे, याकडं आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

जय पवार नेमकं काय करणार?

अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे सोमवारी, ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, या पत्रकार परिषदेचं ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही. पण यापूर्वीच काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जय पवार करत होते. एकीकडं रोहित पवारांनी सातत्यानं अजित पवारांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. यासाठी त्यांनी व्हीएसआर कंपनी कशी दोषी आहे याचे अनेक दाखलेही दिले आहेत. त्यानुसार, या कंपनीवर सध्या देशात बंदीही घालण्यात आली आहे.

व्हीएसआर कंपनीवर कारवाई

आत्तापर्यंत रोहित पवारांसह सोशल मीडियातून सर्वसामान्य नागरिक देखील अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित करत होते. खुद्द शरद पवारांनी अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी हा केवळ अपघात असून घातपात नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मात्र त्यानंतर सातत्यानं पुरावे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याअनुषंगानं शरद पवारांनी केलेलं विधान हे केवळ त्याक्षणापुरतं परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केलेलं होतं असंही त्यांनी म्हटलं होतं. पण इतके दिवस खुद्द अजित पवारांचे घरातले लोक म्हणजेच मुलं पार्थ-जय आणि पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काहीच भाष्य केलं नव्हतं. पण आता जय पवार यासाठी पुढे आले असल्यानं अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबतच्या शंका वाढायलाच लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT