Jayant Patil, Pimpri-Chinchwad News
Jayant Patil, Pimpri-Chinchwad News Sarkarnama
पुणे

Jayant Patil : विलास लांडेंच्या बॉलवर जयंत पाटलांचा षटकार

उत्तम कुटे

पिंपरी : राजकारणात निष्णात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे क्रिकेट खेळातही निपूण असल्याचा प्रत्यय पिंपरी चिंचवडमध्ये आज (ता.५ डिसेंबर) आला.

शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त मोशी येथे आयोजित केलेल्या `योद्धा ८३ या सोसायटी क्रिकेट प्रिमियर लीग` स्पर्धेत त्यांनी हजेरीच लावली नाही, तर ते क्रिकेटही खेळले. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांच्या गोलंदाजीवर त्यांनी षटकार खेचला. (Jayant Patil, Pimpri-Chinchwad News)

राष्ट्रवादीच्या (NCP) पिंपरी-चिंचवड शहर महिलाध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक वसंत बोराटे,उद्योजक आतिष बारणे तसेच विशाल जाधव, विशाल आहेर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा २ डिसेंबरपासून भरविण्यात आली आहे.

पवारांच्या वाढदिवसापर्यंत म्हणजे १२ डिसेंबरपर्यत ती चालणार आहे. तिचे उद्घाटन स्थानिक गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीचे १०४ पुरुष, तर सहा महिला असे १० संघ स्पर्धेत सामील झाले आहेत. त्यातील विजेत्याला ५१, तर उपविजेत्या टीमला ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस आहे.सामना आणि स्पर्धेच्या मानकऱ्याला सात हजार ७७७ रुपयांचे इनाम आहे.

दरम्यान, आज अचानक पाटील (Jayant Patil) यांनी या स्पर्धेला हजेरी लावली. खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते चक्क मैदानात उतरले. त्यांनी बॅट हातात घेतली. समोरून भोसरीचे माजी आमदार व पक्षाचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे हे गोलंदाजीला आले. त्यांच्या चेंडूला त्यांनी सीमापार पाठवले अन् एकच जल्लोष झाला. त्यातून राजकारणात पारंगत असलेले पाटील हे क्रिकेटमध्येही निष्णात असल्याचे दिसून आले. नंतर त्यांनी पिंपळे निलख, विशालनगर, वाकड, कस्पटेवस्तीतील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या भव्य श्रीराम कथा महोत्वास भेट दिली. त्यांचा हा नियोजित दौरा नसल्याने पक्षाच्या सर्व शहर पदाधिकाऱ्यांना त्यात हजेरी लावता आली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT