Himachal Pradesh Election Exit Poll 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता राखू इच्छिणारा भाजप व पुनरागमन करू इच्छिणारी काँग्रेस यांच्यात कुणाची सरशी होणार याचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. हिमाचल विधानसभेच्या ६८ जागांसाठी झालेलं मतदान सुमारे ६५.९२ टक्के झालं आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. आता या निवडणुकीचा निकाल आठ डिसेंबरला लागणार आहे. (BJP, Congress, Himachal Pradesh Exit Poll 2022 Latest News)
दरम्यान, या निवडणुकीचे एक्झिट पोल आले असून यामध्ये भाजपचे पारडे जरी जड दिसत असले तरी काँग्रेसचे पुनरागमन होऊ शकते, अशीही चिन्हे टिव्ही ९ भारतवर्षच्या एक्झिट पोलनुसार दिसत आहेत.
हिमाचल मधील ६८ जागांपैकी भाजपला सुमारे ३४ ते ३९ जागा मिळतील तर काँग्रेसलाही २८ ते ३० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या निवडणुकीचा निकाल अटीतटीचा लागणार, असे मत राजकीय जाणकार सांगत आहेत. तर एक्झिट पोलनुसारही अशीच आकडे दाखवली जात आहेत. मात्र, इतर एक्झिट पोल याबाबत काय आकडे सांगतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, हिमाचलमध्ये (Himachal) १९८२ पासून भाजप (BJP) व काँग्रेसला (Congress) आलटून पालटून सत्ता मिळाली आहे. त्यामुळे यावेळी ही परंपरा कायम राहते की भाजप ती खंडीत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मात्र एक्झिट पोलनुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार फाईट होणार, असे संकेत मिळत आहेत. बहुमतासाठी ३५ चा आकडा गाठणे आवश्यक आहे.
दरम्यान, दोन्हीही पक्ष बहुमताच्या आकड्याच्या जवळ असल्याने काहीही होऊ शकते, असे एक्झिट पोलनुसार दिसत आहेत. आता आठ डिसेंबरला काय निकाल लागतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.