Jayant Patil Sarkarnama
पुणे

जयंत पाटील म्हणाले; आघाडीबाबत निर्णय अद्याप व्हायचायं

पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पाटील यांनी आज पुण्यात मेळावा घेतला.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुका स्वबळावर लढायच्या की महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढायच्या यावर अजून आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा झाली नाही.सर्वांशी चर्चा करूनच अंतीम निर्णय घेण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज पुण्यात सांगितले.

पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पाटील यांनी आज पुण्यात मेळावा घेतला.यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील निवडणूक तसेच राज्यातील इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकांबाबत भाष्य केले.निवडणुका लढविताना आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचे याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र, कार्यकर्त्यांनी काणतीही परिस्थिती आली तरी लढण्याची तयारी ठेवावी, असे सांगितले.

यूक्रेनला विमाने जात आहेत असे दाखवले जात आहे. मात्र, यूक्रेनमध्ये असलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना केंद्र सरकारने त्वरित तिथून सुखरूप मायदेशी परत आणले पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली. अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पक्ष करत आहे. मात्र, आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. नवाब मलिक यांच्याबाबत विधानसेभत चंद्रकांत पाटील जी भूमिका मांडतील त्याला आम्ही तिथे योग्य उत्तर देऊ.नवाब मलिक,अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत.आरोप अजून सिद्ध झाले नाहीत.त्यामुळे ते मालिकांचा राजीनामा मागतात म्हणून आम्ही मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्यावर बोलताना पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहिती आहे. या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयानेदेखील निर्णय दिलाय. त्यामुळे त्यांनी अशा गोष्टी टाळायला हव्यात.राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत.त्यांनी अशाप्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही.’’भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत विचारले असते. काही लोकांबाबत न बोललेलं बरं असे सांगत यांनी सोमय्या यांच्या विषयावर बोलण्यास नकार दिला.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT