...म्हणून पुण्यात उभं राहिलं दीनानाथ मंगेशकर रूग्णालय

वडिलांचे अकाली निधन झाले.त्यानंतर आम्हा सर्व भावंडांना आईच्या मायेने लतादीदीने वाढविले.
Mangeshkar Hospital
Mangeshkar HospitalSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुण्यात १९४२ साली आमच्या वडिलांचे निधन झाले. वेळेत उपचार मिळाले नाहीत, रूग्णवाहिका मिळाली नाही म्हणून त्यांचे निधन झाले. म्हणून काहीही झाले तरी पुण्यातच भव्य रूग्णालय उभारायचं हे लतादिदींचे स्वप्न होते, अशी आठवण ज्येष्ठ गायिका आशा भासले यांनी रविवारी सांगितली.

Mangeshkar Hospital
...असा असेल पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्यावीते दिवंगत गायिका लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या.बोलताना आशा भोसले यांना अश्रू अनावर झाले. तुमच्यासाठी लता मंगेशकर यांचे निधन झाले. मात्र, आमच्यासाठी सारं काही संपलं आहे, अशा शब्दात भोसले यांनी भावना व्यक्त केल्या.

Mangeshkar Hospital
बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनासाठी वेळच नाही....

त्या म्हणाल्या, ‘‘ वडिलांचे अकाली निधन झाले.त्यानंतर आम्हा सर्व भावंडांना आईच्या मायेने लतादीदीने वाढविले.आज सव्वा महिना झाला लतादीदीच्या निधनाला इतक्या लवकर अशा सभेत मला बोलावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं.लतीदीदींनी आम्हा भावंडांसाठी खूप काही केले. लहानपाणापासून तिच्या छायेत आम्ही वाढलो.’’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ‘‘ लता मंगेशकर यांचे निधन झाले आणि या जगातून तणावमुक्त स्वर गेला. हा स्वर आता परत होणे शक्य नाही. अत्यंत खडतर जीवन त्यांना जगावे लागले.प्रत्येक संकटाचा त्यांनी धैर्याने सामना केला.त्या फार शिकल्या नव्हत्या.मात्र, जगातील सर्वात सुशिक्षितांच्या रांगेत त्यांना बसवावे असे त्यांचे व्यक्तीमत्व होते.सुचिता, अनुशासन हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com