Jejuri Shasan Aplya Dari : Sarkarnama
पुणे

Jejuri Shasan Aplya Dari : पक्क ठरलं !; शिंदे-फडणवीस-पवार वेळ काढणार, जेजुरीला येणार..

सरकारनामा ब्युरो

Pune : खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींमुळे जेजुरीतील "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम काही दिवसापूर्वी रद्द करण्यात आला होता. आता हा कार्यक्रम २३ जुलै रोजी होत आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक सरपंचही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे हा कार्यक्रम ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देत राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे ३ जुलैऐवजी ८ जुलै ही तारीख मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती.

मात्र, मंत्रिमंडळ विस्तारामुळे ऐनवेळी ही तारीखही रद्द करत १३ जुलै ही नवी तारीख कार्यक्रमासाठी देण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे हा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला होता.

तीनवेळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुणे जिल्हातून २५ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

तेरा जुलैच्या कार्यक्रमासाठी शेड उभारण्यात आले होते. कार्यक्रमांच्या आदल्या दिवशी शेडचा सांगाडा कोसळला होता. जेजुरीतील पालखी तळावर भव्य दिव्य असा मंडप टाकण्यात आला होता. साधारणपणे १ लाख ५७ हजार क्वेअर फूट क्षेत्रफळाचा व सुमारे २१ हजार लोकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात आला होता. याच ठिकाणी आता हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठीची तयारी सुरु आहे.

अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच पु्ण्यात येणार आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमात काय बोलणार, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT