Jitendra Awhad News, Jitendra Awhad on Raj Thackeray  sarkarnama
पुणे

साध्वी आणि कर्नल पुरोहित यांच्याबाबत राज ठाकरे गप्प का? आव्हाडांचा सवाल

अतिरेकी म्हणायला खूप सोप्पं असतं.कारण स्टॅम्पिंग करता येतं. पण, म्हणून त्यासाठी आधी इतिहास वाचावा,

उत्तम कुटे

पिंपरीःमनसे`अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच (ता.१२) ठाण्याच्या उत्तर सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर तुफान हल्ला चढवला. त्यातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांना त्यांनी विशेष लक्ष्य केलं. (Jitendra Awhad on Raj Thackeray)

आव्हाड यांचा चेहरा नागासारखा दिसतो. तसेच त्यांच्या मुस्लिम बहुल मुंब्रा मतदारसंघात अनेक अतिरिकी सापडल्याचा आरोप राज यांनी करीत काही मुस्लिम समुदायाला अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला लगेचच दुसऱ्या दिवशी (ता.१३) आव्हाड यांनी जशास तसे उत्तर दिले. ''राज यांचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतो,'' असे म्हणत ''राज्याच्या राजकीय पटलावर एक नवीन जॉनी लिव्हर जन्माला आला आहे,'' असा टोला त्यांनी राज यांना लगावला होता.

आव्हाड यांचा राज यांच्यावरील हल्लाबोल सुरुच आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला बुधवारी (त.१३) रात्री आव्हाड यांनी भेट दिली. त्यानंतर मिडियाशी बोलताना त्यांनी राज यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. त्याचवेळी आपल्या मतदारसंघातील मुस्लिम बांधवांची बाजूही हिरीरीने मांडली. त्यांना अतिरेकी ठरवण्याचा राज यांचा दावा त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

२००९ ते २००२ दरम्यान मुंब्रा येथे तीन धाडी पडल्या.त्यात ज्या व्यक्ती सापडल्या,त्या अतिरेकी असल्याचे अद्याप शाबीत झालेले नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले. मग अतिरेकी कोण, तर नथूराम गोडसे. कारण त्याने गोळ्या झाडल्या अन फासावर गेला, त्याला अतिरेकी म्हणतात,असे ते म्हणाले.

अतिरेकी म्हणायला खूप सोप्पं असतं.कारण स्टॅम्पिंग करता येतं. पण, म्हणून त्यासाठी आधी इतिहास वाचावा, कायद्याची पुस्तके वाचावीत आणि मग अतिरिकेी म्हणून ठप्पा मारावा, असा उपरोधिक सल्ला त्यांनी राज यांना दिला. साध्वी कोण आहे, कर्नल पुरोहित कोण आहे, असे म्हणत त्यांचं नाव राज का घेत नाहीत, अशी विचारणा त्यांनी केली. मुसलमानाला अतिरेकी म्हणून स्टॅम्प केलं,की आपलं काम संपलं, असं होत नाही, असे ते म्हणाले.

'यांच्या बाजूने असेल,तो मुसलमान देशप्रेमी आणि नसेल तो देशद्रोही असे सर्टिफिकेट द्यायचं राज यांनी दुकान काढलंय का,' असे संतप्तपणे ते म्हणाले. ''त्यांचा मित्र हाती अराफत शेख हा दाढी ठेवतच नाही, मग मशिदीत वस्तरा कसा मिळणार,'' असे म्हणत त्यांनी राज यांच्या वक्तव्याची कुचेष्टा केली.

दरम्यान,तत्पूर्वी प्रबोधन पर्वातील भाषणात ओबीसींनी एकत्रित होऊन आरक्षणाची लढाई लढण्याचे आवाहन आव्हाडांनी केले. कारण आरक्षण गेल्यास काहीच मिळणार नाही, असे ते म्हणाले.

संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असून ती प्रामाणिकपणे पार पाडली नाही तर प्रतिगामी शक्ती या देशाची धर्म, जात, पंथ आणि प्रांत अशा चार भागात विभागणी करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. संसदेत आता कायदा पारीत करण्याच्या प्रक्रियेला डावलून ते पारित केले जात आहेत. हे संविधानासाठी घातक आहे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT