इंदुरीकर महाराज थोडक्यात बचावले ; वाहनाला अपघात; चालक जखमी

जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी निघाले असता ही घटना घडली.
Indurikar Maharaj News Updates, Indurikar Maharaj Latest news, Indurikar Maharaj Accident news update
Indurikar Maharaj News Updates, Indurikar Maharaj Latest news, Indurikar Maharaj Accident news updatesarkarnama
Published on
Updated on

जालना : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj)यांच्या वाहनाला अपघात (Indurikar Maharaj Accident) झाला आहे. या अपघातातून ते थोडक्यात बचावले. इंदोरीकर महाराज हे स्कॉर्पिओतून परतूर शहरात रात्री किर्तनासाठी जात असताना हा अपघात झाला. (Indurikar Maharaj Accident news update)

लाकडं वाहून नेणारी ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरला इंदुरीकर महाराज यांच्या कारची धडक झाल्याने हा अपघात (Accident) झाला. या अपघातात इंदुरीकर सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर (Partur) येथे बुधवारी (13 एप्रिल) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी निघाले असता ही घटना घडली.

Indurikar Maharaj News Updates, Indurikar Maharaj Latest news, Indurikar Maharaj Accident news update
अजितदादांवरील आरोप पोरकट ; शरद पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं

महाराज परतूर तालुक्यातील खांडवीवाडी या ठिकाणी कीर्तनासाठी जात असतांना शहरातील साईनाथ कॉर्नर जवळ हॉटेल मधूबन समोरील रस्ताक्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महाराजांची स्कॉर्पिओने जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे.

अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही प्रकारची इजा झाली नाही. मात्र चालक जखमी झाल्याने त्याला परतूर पोलिसांनी तात्काळ शहरातील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचरासाठी दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर पोलिसानी महाराजांना दुसऱ्या वाहनातून कीर्तनासाठी खांडवीवाडी रवाना केले असल्याची माहिती समोर आली आहे.

Indurikar Maharaj News Updates, Indurikar Maharaj Latest news, Indurikar Maharaj Accident news update
राज साहेब, भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलताहेत याचं दुःख आहे!

ट्रॅक्टरचालक आणि इंदुरीकरांचा वाहन चालक अशा दोघांनीही एकाच वेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला अशी भावना व्यक्त केली जात आहे. आपल्या विनोदी आणि मार्मिक शब्दफेकीमुळे तसे आपल्या खास शैलीमुळे इंदुरीकर महाराज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.

अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादही निर्माण झाले आहेत. महिला संघटना आणि अंधश्रद्धा निर्मुलन संघटनांच्या रडारवर इंदुरीकर महाराज नेहमीच असतात, असे असले तरी काही वादग्रस्त बाबी वगळता इंदुरीकर महाराज ज्या पद्धतीने वास्तव दर्शन घडवतात तसेच, आयुष्याच्या मार्गावरुन तरुण वयात भरकटलेल्या तरुणांपासून ते लहान थोरांपर्यंत सर्वांनाच जे मार्गदर्शन करतात ते डोळ्यात अंजन घालणारे असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com