BJP Protested Against Awhad Sarkarnama
पुणे

Jitendra Awhad news : ..तर आव्हाडांना पुण्यात फिरु देणार नाही, भाजपचा इशारा !

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यासमोर झालेल्या आंदोलनात मस्तवालपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने बुधवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. आव्हाडांवर कारवाई न झाल्यास त्यांना पुण्यात फिरु देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याबद्दल बोलताना भाजपचे (BJP) आमदार सुनील कांबळे म्हणाले, ज्यांच्या पक्षाचे नेते पदोपदी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करत असतात त्यांच्याच पक्षाचे विकृत आमदार असे कृत्य करत असेल तर कथाकथित जाणते राजे या मस्तवाल आमदारावर कारवाई करणार का? असा सवाल कांबळे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार राम सातपुते म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष संविधान बदलणार आहे, अशी वल्गना केली. परंतू प्रत्यक्षात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांनी नक्की महाविकास आघाडीची मानसिकता स्पष्ट केली आहे. हे कृत्य म्हणजे देशाचा अपमान आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) या विकृतावर तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.

शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, आव्हाड ही विकृती आहे. ही विकृती भारतीय जनता पार्टी ठेचून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. आव्हाड यांना पुण्याच्या अनुभव आहे. त्यामुळे जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जितेंद्र आव्हाडला पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा घाटे यांनी दिला आहे. यावेळी अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष भीमराव साठे , सरचिटणीस राघवेंद्र मानकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे, किरण कांबळे, अतुल साळवे, राजेंद्र काकडे, गणेश यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT