Jyoti Mete and Pawar Sarkarnama
पुणे

Jyoti Mete News : ज्योती मेटेंचा पवार गटातला प्रवेश 'या' कारणामुळे पडला लांबणीवर!

सरकारनामा ब्यूरो

Jyoti Mete and Sharad Pawar News : शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या आणि दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील प्रवेश तांत्रिक कारणामुळे लांबणीवर पडला आहे. ज्योती मेटे बुधवारी पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होत्या. मात्र त्या सध्या शासकीय सेवेत आहेत. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शरद पवार व ज्योती मेटे(Jyoti Mete) यांची मंगळवारी पुण्यात भेट झाली होती. या भेटीत बीडमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी डॉ. ज्योती मेटे यांना देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. तर बुधवारी पुन्हा शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडच्या निवडणुकीबाबत रणनीतीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ज्योती मेटे यांच्यात मागच्या आठ दिवसांपासून संपर्क सुरू होते. जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांत डॉ. ज्योती मेटे तगड्या उमेदवार ठरू शकतात, असा मतप्रवाह पक्षात तयार झाला. त्यानंतर मंगळवारी शरद पवार(Sharad Pawar) व डॉ. ज्योती मेटे यांची भेट झाल्यानंतर त्यांना उमेदवारीबाबत ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याची खात्रिलायक माहितीही समोर आली आहे.

महाविकास आघाडीत बीडची जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही बीडसाठी तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. पक्षाकडून माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. सुशीला मोराळे, ईश्वर मुंडे आदी तयारी करत आहेत. त्यात डॉ. ज्योती मेटे, बजरंग सोनवणे, बी. बी. जाधव, डॉ. अशोक थोरात यांच्या नावांचीही भर पडल्याचे दिसत आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बाहेर पडलेले बीडमधील नेते बजरंग सोनवणे यांचा आज राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. बजरंग सोनवणे हे बीड जिल्ह्यातील केज इथले आहेत. ते बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांनी 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.

यावेळी ते विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. बीड मधील माजलगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीच त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याचं बोललं जातंय.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT