Lok Sabha Election 2024 : ...म्हणून महायुती मनसेला सोबत घेत आहे; राज ठाकरे-अमित शाहांच्या भेटीवर जयंत पाटलांची टीका

Raj Thackeray and Amit Shah News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्या भेटीवर प्रश्न विचारला असता, त्यांनी महायुतीवर टीका केली आहे.
Jayant Patil, Raj Thackeray, Amit Shah
Jayant Patil, Raj Thackeray, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha Election 2024 : देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) कंबर कसली आहे. आघाडीच्या नेत्यांनी मतदारांशी संपर्क करायला सुरुवात केली आहे, तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बारामती आणि शिरूर मतदारसंघांतही (Baramati and Shirur constituencies) आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) पुणे-बारामतीमध्ये ठाण मांडून आहेत.

पुणे मुक्कामी असलेल्या शरद पवारांची (Sharad Pawar) अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हेदेखील शरद पवार यांच्यासोबत पुण्यातील मोदीबागेत उपस्थित आहेत. या वेळी पाटील माध्यमांशी संवाद साधत वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळे नेते पवारसाहेबांना भेटण्यासाठी येत असून, त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha Constituency) इंडिया आघाडीने प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र मेळावे घ्यावेत, अशी चर्चा बैठकीत झाल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"भाजपला विजयाचा आत्मविश्वास नाही..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह (Raj Thackeray and Amit Shah) यांच्या भेटीवर प्रश्न विचारला असता, त्यांनी महायुतीवर टीका केली आहे. पाटील म्हणाले, "मनसेने भाजपला (BJP) का पाठिंबा दिला? हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे. भाजपकडे एवढे संख्याबळ असताना त्यांना आणखी पक्षांची गरज का पडली? याचा अर्थ आपण विजयी होऊ असा आत्मविश्वास त्यांना नाही. म्हणून त्यांना इतर पक्षांची मदत घेऊन निवडणुकीत उतरावे लागत असून, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना पूर्ण आत्मविश्वास नाही का? हा प्रश्न मनसेच्या मदतीमुळे निर्माण होत आहे."

"महादेव जानकर आमचेच..."

माढा लोकसभासंदर्भात भाजपमधील कुणीही आमच्याशी संपर्क केला नाही. कुणाशी आमचा संवाद झालेला नाही. आम्ही आमचा उमेदवार ठरवत आणला आहे. योग्यवेळी नाव जाहीर करू. या मतदारसंघात आमचा किंवा मित्रपक्षाचा सक्षम उमेदवार उभा करू. महादेव जानकर (Mahadev Jankar) आमचेच आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीत आमच्यासह इतर मित्रपक्ष सहभागी असल्याने स्वतंत्रपणे जागा घोषित करणे हा आमचा अधिकार नाही. महाआघाडीच्या जागावाटपामध्ये जी जागा मिळेल ती जागा आम्ही घोषित करू, असंही पाटील यांनी सांगितलं.

Jayant Patil, Raj Thackeray, Amit Shah
Lok Sabha Election 2024 News: `शिरूर`मधील पेच मिटला; अजितदादांनी आढळरावांच्या उमेदवारीला असलेला मोहितेंचा विरोध केला दूर

प्रकाश आंबेडकर यांच्या पत्राविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पत्र मी वाचले, त्यांच्याशी आघाडीबाबतची चर्चा सुरू आहे. त्यांच्याविषयी मी जास्त काही बोलणार नाही. मात्र, आघाडी नाही झाली तर यावर बोलू, आज विनाकारण जाहीर वक्तव्य करणे योग्य नाही. मी त्यांच्याविषयी कोणतेही भाष्य करणार नाही."

Jayant Patil, Raj Thackeray, Amit Shah
Lok Sabha Election 2024 : ...अन् पवारांबरोबरच्या बैठकीतून जानकर तडकाफडकी निघून गेले; नेमकं काय घडलं?

"नगर दक्षिणमध्ये तुतारी वाजणारच!"

पाटील यांनी या वेळी आमदार नीलेश लंके यांच्याविषयी आत्मविश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, लंके हे फार लोकप्रिय आहेत. ते उभे राहिले तर 100 टक्के निवडून येतील. लंके लोकसभेचे उमेदवार व्हावेत असं आम्हाला वाटतं. शिवाय नगर दक्षिणमध्ये तुतारी वाजणारच, असा विश्वासही जयंत पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com