पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय पर्याय काय असा प्रश्न विचारला जातो. मात्र, कोणत्याही आजाराला पर्याय विचारला जात नाही तर त्यावर इलाज केला जातो हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे सांगत कोरोनावरदेखील इलाज म्हणून लस शोधण्यात आल्याचे उदाहरण कॉंग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी आज दिले.
संपूर्ण भाषणात कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चौफेर टीका केली.कॉंग्रेस प्रवेश केल्यानंतर कन्हैयाकुमार यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. या सभेला कन्हैयाकुमार यांनी मार्गदर्शन केले.ते म्हणाले,‘‘ स्वातंत्र्यानंतरच्या काळात ‘बीएसएनएल’पासून रेल्वे,‘एअर इंडिया’सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे.देश स्वतंत्र झाल्यापासून कॉंग्रेसच्या काळात र्साजनिक क्षेत्रातील कंपन्या वाढविणण्याचा, टिकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्र सरकारने धोकेबाजी करीत या कंपन्या विकण्याचे काम केले आहे.त्यामुळे ज्यांना देशाच्या सर्व मालमत्ता विकायच्या आहेत त्यांनी भाजपात जावे तर ज्यांना या मालमत्ता वाचवायच्या आहेत त्यांनी कॉंग्रेसमध्ये राहावे.’’
कन्हैयाकुमार म्हणाले, ‘‘ कॉंग्रेस ही संस्कृती आहे. समानता हा या पक्षाचा आत्मा आहे.संविधान टिकले तर देश टिकेल, ही कॉंग्रेसची भूमिका आहे.त्यामुळे या पुढच्या काळात देशाचा मूळ गाभा असलेल्या समतेच्या तत्वाला गालबोट लावणाऱ्या भाजपाच्या विरोधात समर्थपणे उभे राहण्याची गरज आहे. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपण हे कार्य समर्थपणे पार पाडू.’’
कन्हैयाकुमार म्हणाले, ‘‘ महागाईने सामान्य जनता त्रासली असताना देशाचे पंतप्रधान या विषयावर बोलायला तयार नाही. गेल्या सात वर्षातील या सरकारच्या घोषणा आठवल्या तर या सरकारने लोकांची किती फसवणूक केली हे लक्षात येईल.केंद्र सरकार केवळ फसवणूक करणारे सरकार असून सामान्यांसाठी या सरकारला कसलीही कणव नाही.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.