पुणे पालिकेतील पदोन्नती घोटाळ्यात ‘आप’ची पोलिसांकडे धाव

एकंदरीत या प्रकरणात पुणे महानगरपालिकेची, राज्य शासनाची आणि जनतेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली आहे.
पुणे महानगरपालिका भवन
पुणे महानगरपालिका भवनसरकारनामा

पुणे : बोगस इंजिनिअर डिप्लोमा प्रमाणपत्राच्या आधारे पुणे महानगरपालिकेमध्ये (PMC) कनिष्ठ अभियंता पदासाठी पदोन्नती मिळवण्यासाठी पालिकेत चालू असलेले रॅकेट (Racket) काल आम आदमी पक्षाच्यावतीने (Aam aadmi Party) उघड करण्यात आले होते.एकंदरीतच या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची तसेच सद्यस्थितीतील पदोन्नती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.ज्यांनी इंजिनिअर डिप्लोमा प्रमाणपत्र सादर केलेली आहे त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे आज करण्यात आली.

पुणे महानगरपालिका भवन
हेलिकाॅप्टर अपघात : CDS बिपीन रावत यांचे निधन

एकंदरीत या प्रकरणात पुणे महानगरपालिकेची, राज्य शासनाची आणि जनतेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली आहे. बोगस इंजिनीयर डिप्लोमा प्रमाणपत्र सादर करुन पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती मिळवण्याच्या रॅकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवघेव, भ्रष्टाचार झालेला असण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच या अगोदरही अशा पद्धतीने इंजिनीयरपदासाठी अनेक बोगस जणांना प्रमोशन दिल्याच्या घटना लक्षात घेता आज आम आदमी पक्षातर्फे पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे अधीक्षक राजेश बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.

पुणे महानगरपालिका भवन
Helicopter Crash : बिपीन रावत यांच्यासोबत कोण होते? नावे आली समोर...

पुणे महानगरपालिकेच्या २०२१ मधील कनिष्ट अभियंता (स्थापत्य) पदोन्नती भरती प्रारूप सेवा जेष्ठता यादीतील १८ जण आणि विधी अधिकारी, पुणे महानगरपालिका यांच्या विधी विभाग जावक क्रमांक २७०२ दिनांक १५ डिसेंबर २०१७ च्या पत्रात उल्लेख केलेले ११ जण तसेच एकंदरीत बोगस इंजिनीयर डिप्लोमा प्रमाणपत्र सादर करुन पुणे महानगरपालिकेत कनिष्ट अभियंता पदी पदोन्नती मिळवणारे कर्मचारी, ते मंजूर करणारे अधिकारी आणि एकंदरीत रॅकेटची चौकशी करुन फसवणूक, भ्रष्टाचार, अवैध आर्थिक देवाण-घेवाणचे गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशी मागणी यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे आणि रोहन रोकडे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com