Ajit Pawar, Siddaramaiah News Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : कार्यक्रम सिद्धरामय्यांचा; पण चर्चा अजितदादांच्या समयसूचकतेची

Siddaramaiah News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज (ता. २५) बारामतीच्या दौऱ्यावर होते.

मिलिंद संगई, बारामती

Baramati News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आज (ता. २५) बारामतीच्या दौऱ्यावर होते. या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय कौशल्य दाखवत उपस्थितांना उशीर होत असतानाही जागेवरुन हलू दिले नाही.

अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्या वतीने बारामतीत (Baramati) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विनंतीवरुन बारामतीत येणार होते. त्या मुळे स्वताः अजित पवार व सुप्रिया सुळे दुपारी दोन वाजल्यापासूनच कार्यक्रमस्थळी हजर होते.

प्रत्यक्षात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा लांबला. बारामतीत तीन वाजता ते येणार असे नियोजित होते. मात्र, त्यांना उशीर होतोय हे पाहिल्यानंतर स्वताः अजित पवार (Ajit Pawar) यांनीच माईकचा ताबा घेत मुख्यमंत्र्यांना यायला दोन तास तरी लागतील असे सांगितले. मात्र ते स्वताः आणि सुप्रिया सुळे हे पूर्णवेळ व्यासपीठावरच बसून राहिले व त्यांनीच विविध वक्त्यांना विचार मांडायला सांगितल्याने उशीर होऊनही कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.

सिद्धरामय्या यांना वेळेत विमानतळावर पोहोचायचे असल्याने पुन्हा एकदा अजित पवारांनीच सूत्रे हातात घेत कार्यक्रमात बदल करत वेळेत कार्यक्रम संपवून त्यांना विमानतळापर्यंत स्वताः नेऊन सोडले. विमानतळावर त्यांच्या स्वागतालाही ते गेले होते. या सर्व धावपळीत समयसूचकता दाखवून कार्यक्रमाचा कोठेही बेरंग होणार नाही याची काळजी लोकप्रतिनिधी या नात्याने घेतली. त्यांच्या या समयसूचकतेचीच नंतर चर्चा रंगली.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT