Karnataka News : ''लोकसभेपूर्वी काँग्रेसचे कर्नाटकमधील सरकार कोसळणार; भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ''

Karnataka Government News : काँग्रेस सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणार नाही.
Karnataka CM Oath  Ceremony : siddaramaiah
Karnataka CM Oath Ceremony : siddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

BJP leader news : काँग्रेस सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲक्सीटेंड (अपघात) होऊन सरकार पडेल, असा दावा विजयपूरचे भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले.

बेळगाव येथील गांधी भवनमध्ये रविवारी भाजपा (BJP) कार्यकर्त्यांच्या सभेला उद्देशून ते बोलत होते. सिद्धरामय्या (Siddaramaiah) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. तर दुसरीकडे डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) शांत बसणार नाहीत. गॅरंटी योजनांची इतिश्री झाली आहे. गॅरंटी योजनांची हमी देणे शक्य नाही. कोणतेही सरकार सत्तेत आले तरी त्यांना गॅरंटी योजना राबविता येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

Karnataka CM Oath  Ceremony : siddaramaiah
Ajit Pawar News : कार्यक्रम सिद्धरामय्यांचा; पण चर्चा अजितदादांच्या समयसूचकतेची

गॅरंटी योजनेमुळे कर्नाटकामध्ये अराजकता सुरू झाली आहे. या स्वरुपाच्या घोषणा बसवराज बोम्मई यांनाही जाहीर करता आल्या असत्या. मात्र, ज्या गोष्टींची कार्यवाही शक्य नाही, त्याची घोषणा न करणे योग्य आहे, असे यत्नाळ यांनी सांगितले.

कॉंग्रेस (Congress) सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा फडकाविण्यात आला. हिंदू कार्यकर्त्यांवर हल्ले सुरु आहेत. हिंदूंचा आवाज दाबण्यासाठी राज्यामध्ये षडयंत्र सुरु आहे. देश टिकला पाहिजे आणि हिंदू सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून २८ पैकी २८ जागा या जिंकून देऊन परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहाती देशाची सुत्रे द्यावी, असे आवाहन केले.

Karnataka CM Oath  Ceremony : siddaramaiah
Sangola News : सराफ व्यावसायिकांच्या मदतीला धावले बाबासाहेब देशमुख : थेट कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

आमच्या पक्षात काही अतृप्त आत्मे आहेत. पक्षाच्याच उमेदवारांचा पराभव करण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, मतदार संघामध्ये न जाता निवडून आलो आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे, म्हणून घरामध्ये बसून कसे चालेल. आपण सर्वांनी मिळून आजपासून काम सुरु करून पक्षाला परत सत्तेत आणावे, असे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com