Kasaba By Election bjp Hemant Rasane News  sarkarnama
पुणे

Kasaba By Election : उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने म्हणाले, "गिरीश बापट यांच्या.."

Kasaba By Election Hemant Rasane News : विक्रमी मतांनी भाजप जिंकणार

सरकारनामा ब्युरो

Kasaba By Election Hemant Rasane News : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रासने यांनी प्रथम दगडूशेठ गणपतीची आरती केली. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिरासमोर फटाक्यांची आतषबाजी केली.

"कसबा विधानसभा पोटनिवडणूक विक्रमी मतांनी भाजप जिंकणार," असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक लढवली जाईल, असे रासने म्हणाले.

"कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला केली होती. भाजप ही निवडणूक जिंकण्यास सक्षम आहे," असे रासने यांनी सांगितले.

भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणून हेमंत रासने यांची ओळख आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे ते अध्यक्ष होते. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे.चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची काल (शुक्रवारी) बैठक झाली. त्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचा निर्णय झाला. आज (शनिवारी) उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

रासने यांच्यासमोर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान असणार आहे. धंगेकर यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून लवकरच होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले रविंद्र धंगेकर यांनी जानेवारी २०१७ मध्ये मुंबईत कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT