Kasba By-Election : Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Kasba By-Election : लोकसेवा असो किंवा निवडणूक आयोग निकालाला महत्त्व : मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान !

Kasba By-Election : 'निकाल देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं," मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य..

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यामुळे उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते कसब्यात ठाण मांडून आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ कसब्यामध्ये रोड शो केला, यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, "ही पोटनिवडणुक दुर्दैवाने लागली. मला आज आठवतंय, मुक्ताताई टिळकयांच्या घरी मी एकदा गेलो होतो. त्यांनी या मतदारसंघातले प्रश्न माझ्यासमोर मांडले. कसबा हा भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बापट साहेबांना आम्ही सांगितलं होतं की, आजारी असताना प्रचारात येऊ नका, पण त्यांच्या आतमधला कार्यकर्ता शांत बसला नाही, ते प्रचारात आले. ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. आम्ही विरोधीपक्षांना याबाबत विनंती केली. पण बिनविरोध तर जाऊ द्या, विरोधकांचा जो खालच्या पातळीचा प्रचार चालू आहे, त्याला उत्तर मतदानाच्या दिवशी मतदार देतील."

शिंदे पुढे म्हणाले, "हा एकनाथ शिंदे माणसातला कार्यकर्ता आहे. हा लोकांना भेटणारा माणूस आहे, तोंड लपून पळणारा नाही. एमपीएससीची विद्यार्थी इथे आहेत. त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे. राज्य लोकसेवा आयोगाला सांगितलं की, जनतेचा मनाचा आदर आपल्याला करावं लागेल. शेवटी एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवतो. "

काल अनावधानाने राज्य लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख मुख्यमंत्र्यांकडून झाला होता. यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. पवारांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, "काल चुकून माझ्या तोंडून राज्य लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख झाला. लोकसेवा आयोग काय किंवा निवडणूक आयोग काय? निकालाला महत्त्व आहे. आणि निकाल देण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि मी करून दाखवलं."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT