Kasba By-Election :  Aditya Thackeray
Kasba By-Election : Aditya ThackeraySarkarnama

Kasba By-Election : 'गद्दारांविरूद्ध पहिलं बंड पुण्यातून होणार ; आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी !

Kasba By-Election : "पुण्याची निवडणूक देशाची दिशा ठरवणारी.."
Published on

Kasba By-Election : कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचाराला शेवटचे काही दिवस शिल्लक असताना, उमेदवारांची रणधुमाळी सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते कसब्यात ठाण मांडून आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे आज महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

Kasba By-Election :  Aditya Thackeray
Kasba By-Election : अक्षय गोडसे यांचा व्हिडीओ : म्हणाले...माझा पाठिंबा हेमंत रासनेंनाच!

आदित्य ठाकरे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतकं घाणेरडं राजकारण झालेलं नाही. आपलं नाव चोरलं, आपलं चिन्ह चोरलं, पण या गद्दारांच्या माथ्यावर गद्दार लिहलेलं आहे. तुमचं नाव चोरांच्या यादीत असणार आहे."

ठाकरे म्हणाले, "जेव्हा जेव्हा या देशावर, आपल्या महाराष्ट्रावर कोणीही स्वार करून आलं, तेव्हा या विरोधात पहिलं बंड पुण्यातून झालं आहे. त्यामुळे गद्दारांविरूद्ध पहिलं बंड पुण्यातून होणार आहे. इतिहास पाहिला तर पहिला बंड हा पुण्यातून झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदेखील पुण्यात झाला आहे. ही पुण्याची निवडणूक साधीसुधी निवडणूक नाही, तर देशाची दिशा ठरवणारी आहे. "

Kasba By-Election :  Aditya Thackeray
Chinchwad : ठाकरे गटाच्या शहरप्रमुखावरील हल्ल्याला २०१७ च्या महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी

ठाकरे म्हणाले, "भाजपविरोधात काही बोललं तर तुमच्यामागे पोलिस लावले जातात. घरी धाडी पाडल्या जातात. जणू काही मोघलांचं राज्य आलेलं आहे, असं वातावरण आहे. हे वातावरण खूप भयानक आहे. या देशात अजूनतरी 'सत्यमेव जयते'ला महत्त्व आहे, 'सत्तामेव जयते'ला नाही. म्हणून आम्ही सत्याच्या बाजूने उभे आहोत,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com