Chandrakant Patil Kasba By-Election
Chandrakant Patil Kasba By-Election Sarkarnama
पुणे

Kasba By-Election : कसबा जिंकण्यासाठी चंद्रकांतदादांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र!

सरकारनामा ब्यूरो

Kasba By-Election : राज्याचे मंत्री व भाजपचे प्रमुख नेते चंद्रकांत पाटील यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारासाठी जंग जंग पछाडले आहे. नुकताच त्यांनी वाहनात जागा नसल्यामुळे एका भाजप कार्यकर्त्याच्या मांडीवरून प्रवास केला होता, याची चर्चा झाली होती. आता त्यांनी कार्यकर्त्यांना प्रचारबाबत आदेश दिले आहेत.

"गेली अडीज वर्ष विकासाचे कामे न करता त्या लोकांनी घरी राहून फेसबुकच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. काही न करता घरी बसले, पण भ्रष्टाचार मात्र करत राहिले. आम्ही तुमच्या सारखं घरी बसून सरकार चालवत नाही. अडीच वर्षात उद्धव ठाकरे कुठे कुठे गेले? ते सांगा. तुम लढो हम कपडे सांभालते अशी तुमची संस्कृती," अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

"दोन लाडक्या आमदारांच्या निधनाने ही निवडणूक लागली आहे. यामुळे आपल्याला कामाला लागलं पाहिजे. फक्त कार्यालयात बसू नका, लोकांमध्ये फिरा दिवसभर लोकांच्या घरी भेटी घ्या. आपणं ही निवडणुक जिंकूच. हेमंत रासने यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात घेतली आहे. ते स्वतः प्रचारासाठी येणार आहेत. ते या निवडणुकीत कार्यकर्ता म्हणून प्रचाराला येतील," असे पाटील म्हणाले.

पत्रकार वारिशे हत्या प्रकरणावर पाटील म्हणाले, "जी काही घटना झाली, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. घटनेचे समर्थन नाही. पण तुमच्या सत्ताकारण काय झालं ते ही पाहू," असे पाटील. माजी आमदार मेधा कुलकर्णी भाजप प्रचारात कुठेच, यावर पाटील म्हणाले की, "कोणाही नाराज नाही, सगळेच प्रचारात दिसतील."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT