Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News  Sarkarnama
पुणे

Pune Bypoll News : कसब्याचा निकाल लवकर, तर चिंचवडचा अधिकृत अंतिम निकाल यायला वाजणार रात्रीचे दहा..

Kasba Chinchwad By Election Result 2023 : कसबा हा तुलनेने खूपच लहान मतदारसंघ असल्याने तेथील निकाल खूप लवकर लागणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Kasba Chinchwad By Election Result 2023 : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या रविवारी (२६ फेब्रवारी) झालेल्या पोटनिवडणुकीचा (मतदान) निकाल उद्या (ता.२) लागणार आहे.

त्याची जय्यत तयारी झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी काल (मंगळवारी) मतमोजणी केंद्राची पाहणी करून या ठिकाणी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News

पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले आदींनीही चिंचवडची मतमोजणी होणाऱ्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन,थेरगाव येथील मतमोजणी केंद्राच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली. कसब्याची मतमोजणी कोरेगाव,पुणे येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे.

मतदारसंख्या सर्वात जास्त असलेल्या चिंचवड या राज्यातील मतदारसंघात पन्नास टक्के मतदान झाल्याने मतमोजणीसाठी तेथे १४ टेबल लावण्यात आली आहे. मतमोजणीच्या ३७ फेऱ्या होणार असून अधिकृत अंतिम निकाल यायला वाजणार रात्रीचे दहा वाजणार आहेत. मात्र,कसबा हा तुलनेने खूपच लहान मतदारसंघ असल्याने तेथील निकाल खूप लवकर लागणार आहे.

कसब्याच्या तुलनेत चिंचवडमध्ये कितीतरी अधिक म्हणजे ५१० मतदान केंद्र तसेच उमेदवारांचीही संख्या जास्त म्हणजे २८ होती.चिंचवडला २ लाख ८७ हजार ४७९ इतके मतदान झालेले आहे. याव्यतिरिक्त टपाली मतदानही आहे.त्यामुळे सकाळी सात वाजता सुरु झालेल्या या मतमोजणीचा अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी किमान १४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT