Rupali Thombre Patil On Pahalgam Terror Attack Sarkarnama
पुणे

Pahalgam Terror Attack : रुपाली ठोंबरे अडकल्या काश्मीरमध्ये...; दहशतवादी हल्ल्याचा 'थरार' सांगताना झाल्या भावूक, VIDEO व्हायरल!

Rupali Thombre Patil On Pahalgam Terror Attack : रूपाली ठोंबरे यांनी एक व्हिडिओ शेअर करत श्रीनगरमधील सध्याची परिस्थिती किती भयानक आहे हे सांगत राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. तसेच सरकारला तातडीने घरी जाण्याची व्यवस्था करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 23 Apr : पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील या सध्या आपल्या कुटुंबियांसोबत काश्मीरला पर्यटनासाठी गेल्या आहेत. अशातच काल पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जे पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. त्यामध्ये रूपाली ठोंबरे यांचा देखील समावेश आहे.

रूपाली ठोंबरे यांनी एक व्हिडिओ शेअर करत श्रीनगरमधील सध्याची परिस्थिती किती भयानक आहे हे सांगत राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. तसेच सरकारला तातडीने घरी जाण्याची व्यवस्था करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे. त्यासोबतच त्यांनी काश्मीरमधील स्थानिक नागरिक कशा पद्धतीने पर्यटकांची मदत करत आहेत याची माहितीही दिली आहे.

रूपाली ठोंबरे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत सांगतात, "पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर माझ्यासह 60 टक्के पर्यटक हे श्रीनगरमध्ये अडकले आहेत. काल झालेल्या हल्ल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट आहे. त्यामुळे या ठिकाणी निघण्यासाठी तातडीने विमानाच्या व्यवस्था करावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे.

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एका नाशिकच्या कुटुंबाला स्थानिक टुरिस्ट गाईडने आपल्या घरातच आसरा दिला. जेवू घातलं आणि सुरक्षित स्थळी पोचण्याची व्यवस्था केली. आमच्यासारखे असंख्य पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये अडकून पडले आहेत. काहींच्या फ्लाईट उद्या, परवा आहेत.

मात्र, अशा परिस्थितीत आजच्या आज या ठिकाणी बाहेर पडण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी ही विनंती आमची आहे. मिलिटरी रस्त्यावर उतरली आहे असं सांगण्यात येत असलं तरी इथून बाहेर फिरण्यासाठी कोणीही तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणचे स्थानिक नागरी पर्यटकांना मदत करत आहेत.

या ठिकाणचे स्थानिक पर्यटन व्यवसायावर अवलंबून असून आता त्यांना देखील अश्रू अनावर झाले आहेत. गाड्या लोनवर घेतलेला असताना आता यापुढे कोणतेही टुरिस्ट या ठिकाणी येणार नसल्याने उपासमारीची वेळ यांच्यावर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी ज्या आदिलभाईंनी नाशिकमधील एका मराठी कुटुंबाची मदत केली ते आदिलभाईं म्हणाले की, "झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं त्या ठिकाणी आलेले पर्यटक महिला, लहान बालक हे सुट्ट्या घालवण्यासाठी आले होते. पर्यटक आमच्यासोबत एन्जॉय करत होते.

त्यांचे देखील एन्जॉयमेंट होत होते आणि आमचाही रोजगार चालत होता. इथली अर्थव्यवस्था ही याच पर्यटनकांवर अवलंबून आहे. त्यामुळे हे जे कोणी केलं ते माणूस असू शकत नाही ते जनावर होते. हा माणुसकीवरचा हल्ला असून याचे परिणाम आता आम्हाला भोगावे लागणार आहेत. कोणीतरी एक अशा प्रकारच्या गोष्टी करतो परंतु यामुळे सर्वजण बदनाम होतो."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT