Kolhapur News, 23 Apr : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 30 हून अधिक पर्यटक जम्मू-काश्मिरच्या पहलगाम भागात असल्याची माहिती समोर आली आहे. तर बेळगाव जिल्ह्यातील जवळपास 200 हून पर्यटक या ठिकाणी अडकल्याची माहिती. तर हे सर्व पर्यटक सुखरूप असून उद्या ते परतणार आहेत.
दरम्यान कोल्हापुरातील (Kolhapur) सर्वच पर्यटक सुखरूप असून त्यांच्याशी संपर्क सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे. जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी सायंकाळी हल्ला करत 28 जणांचा बळी घेतला.
या संपूर्ण प्रकारानंतर जम्मू काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती माध्यमात पाहिल्यानंतरपर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संपर्क न होऊ शकल्याने चिंतेत आणखी भर पडली.
केवळ पोस्टपेड सेवा चालू असल्याने काही जणांचा संपर्क झाला. दरम्यान रात्री उशिरा काही पर्यटकांचा नातेवाईकांशी संपर्क झाला. त्यांनी आपण सुखरूप असल्याचं सांगताच नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. तर जम्मू काश्मिरच्या काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्ते वाहून गेले आहेत.
विमान प्रवासाचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यात पर्यटकांना अडचणी येत आहेत. अशातच आता पहलगामध्ये अडकलेले पर्यटक गुरुवारी कोल्हापूरला येण्यासाठी निघणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.