पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) पंचवार्षिक निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या ९१ उमेदवारी अर्जांपैकी गेल्या तेरा दिवसांत दहा जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. उद्या (मंगळवारी, ता. ८ मार्च) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस दिवस आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदान होणार आहे, हे उद्या स्पष्ट होणार आहे. (Katraj Dairy Election: Tomorrow is the last day for withdrawal of applications)
या निवडणुकीसाठी येत्या २० मार्चला मतदान होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ मार्चला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर केले जाणार असल्याचे कात्रज डेअरीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले. (Katraj Dairy Election News Updates)
जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. त्यापैकी आजअखेरपर्यंत (ता. ७ मार्च) तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध झालेल्यांमध्ये गोपाळ म्हस्के (हवेली), मारुती जगताप (पुरंदर) आणि भगवान पासलकर (वेल्हे) या तीन जणांचा समावेश आहे. या तीनपैकी म्हस्के आणि पासलकर हे विद्यमान संचालक असून जगताप हे नवीन आहेत. उर्वरित तेरा जागांसाठी सध्या ८१ जण निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने उद्या दुपारी तीनपर्यंत अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील, अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
मागील तेरा दिवसांत माघार घेणाऱ्यांमध्ये शैलेश म्हस्के (हवेली), शोभा पासलकर, माणिक पासलकर (दोघेही वेल्हे), जनाबाई खिलारी (महिला राखीव), महादेव वाडेकर, प्रकाश बांगर (दोघेही खेड), नितीन थोपटे (भोर), बाळासाहेब साकोरे (शिरूर), भाऊसाहेब नेटके (अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ) आणि संभाजी भुजबळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ) यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.