AAP Pune
AAP Pune Sarkarnama
पुणे

भाजपा का एक ही काल केजरीवाल, म्हणत ‘आप’चे पुण्यात आंदोलन

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा आम आदमी पार्टीच्यावतीने भाजपाच्या पुण्यातील कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘भाजप के इन गुंडो को, स्कूल भेजो सारो को’, ‘भाजपा का एक ही काल, केजरीवाल’ तसेच काश्मिरी पंडीतोके के सम्मान मे, आम आदमी मैदान में’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले.यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या निवसाबाहेरील दरवाजाला भगवा रंग लावला होता. या प्रकरणी युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.दिल्लीतील आंदोलनाच्या निषेधार्थ आज पुण्यात आंदोलन करण्यात आले.

पंजाब विधानसभा निवडणुकीतील यशामुळे ‘आप’च्या देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पुण्यातही आपच्या समर्थकांची संख्या गेल्या काही दिवसात वाढू लागली आहे. मध्यमवर्गीय तसेच कनिष्ठ मध्यमवर्गीयांना आपबद्दल सहानुभूती असून आपच्या कार्यकर्त्यांमध्ये तरूणांची संख्यादेखील वाढू लागली आहे. आजच्या पुण्यातील आंदोलनातदेखील तरूणांची संख्या होती.

भाजपासह कॉंग्रेस आणि इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेणाऱ्या ‘आप’ने दिल्लीपाठोपाठ पंजाबसारख्या राज्यात निर्विवाद यश मिळविल्याने महाराष्ट्रासारख्या राज्यातही आपच्या विचारांना पाठिंबा मिळू शकतो,अशी भावना जनमाणसात निर्माण झाली आहे. त्यामुळे केजरीवाल व आपविषयी कुतूहूल मिश्रित आकर्षण आहे.येत्या महापालिका निवडणुकीत आपच्यावतीने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करण्यात येत असून त्यादृष्टीने पक्षाची संघटना बांधणी सुरू करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT