Pune News, 13 Jul : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून दिल्याने मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय आणि तितकंच धक्कादायक वळण मिळालं आहे. कारण पोलिसांच्या हाती पुरेसे पुरावे लागले आहेत का? आणि ते या आरोपींना शिक्षा देण्यास उपयुक्त आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुरुवातीला 'ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात' म्हणून फाईल बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या या घटनेने अवघ्या तीन आठवड्यांत देशातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या 'हाय-प्रोफाईल' मर्डर मिस्ट्रीचं रूप घेतल आहे. तरुण व्यावसायिक असलेल्या केतनचा त्याच्या ठरलेल्या लग्नाच्या अगदी काही दिवस आधी संशयास्पद मृत्यू झाला.
याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सिया तिच्या ठरलेल्या लग्नामुळे खूश नव्हती आणि तिचे चेतनसोबत प्रेमसंबंध होते, याच त्रिकोणातून केतनला कायमचं संपवण्याचा काटा काढण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
एका कॅफेमध्ये वारंवार बैठका घेऊन या हत्येची 'स्क्रिप्ट' लिहिली गेली आणि त्यानुसारच केतनला लोहगडावरून खाली ढकलून देण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पण, पोलिसांची ही रंजक वाटणारी 'क्राईम स्टोरी' कोर्टाच्या चौकटीत टिकणार का? हाच आता सर्वात मोठा 'ट्विस्ट' ठरतोय. सध्या तरी पोलिसांकडे न्यायालयात टिकेल असा एकही ठोस आणि थेट पुरावा नसल्याची आतली माहिती आहे.
त्यामुळे मीडियामध्ये केवळ हेडलाईन्स बनलेली पोलिसांची ही कहाणी न्यायालयात सपशेल फेल ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर, केवळ संशयावरून किंवा थिअरीवरून कोर्ट कोणालाही फासावर लटकवत नाही. पोलिसांना हा गुन्हा सिद्ध करायचा असेल तर कथित प्रेमसंबंध, कॅफेमधील गुप्त बैठका आणि कट रचण्याच्या संकेतांना थेट 'ठोस पुराव्यांच्या' साखळीत परावर्तित करावं लागेल.
त्यासाठी फोन रेकॉर्ड्स, कपडे, सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन डेटा आणि घटनेनंतर संशयितांचं नेमकं वर्तन कसं होतं, याची एक भक्कम आणि न तुटणारी साखळी न्यायालयासमोर मांडावी लागेल असं विधी क्षेत्रातील सूत्रांच म्हणणं आहे. यातला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे, केतन स्वतः पाय घसरून पडला नाही किंवा त्याने उडी मारली नाही, तर त्याला या दोघांनीच मुद्दाम ढकलून दिलं.
हे पोलिसांना फॉरेन्सिक आणि सायंटिफिक पुराव्यांच्या आधारे सिद्ध करावं लागेल. जर पोलिसांना पुराव्यांची ही साखळी जोडता आली नाही, तर सिया आणि चेतन कोर्टातून थेट निर्दोष सुटू शकतात. त्यामुळे आता पोलिसांची ही 'इन्वेस्टिगेशन स्क्रिप्ट' कोर्टात पास होते की पुराव्याअभावी फेल ठरते, याकडेच संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.