Parliament news : संसदेत इतिहास घडविण्यासाठी भाजपला हवेत फक्त सहा खासदार; देशात 1986 नंतर असं पहिल्यांदाच घडणार

BJP Rajya Sabha majority : राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८६ मध्ये काँग्रेसकडे राज्यसभेत एकहाती बहुमत होते. मात्र, त्यानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha news : देशात २०१४ नंतर भाजपने देशाच्या राजकारणात अनेक नवनवे टप्पे गाठत इतिहास घडविला आहे. देशात एकहाती सत्ता, सलग तीन टर्म बिगर काँगेसी सरकार, २२ राज्यांमध्ये सत्ता, अनेक राज्यांमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री... आता आणखी एक इतिहास घडविण्यासाठी भाजप सज्ज आहे. हा इतिहास घडविण्यासाठी भाजपला पुढील काळात राज्यसभेत केवळ सहा खासदार हवे आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतासाठी आणखी १४ खासदारांची आवश्यकता आहे. भाजप एकहाती बहुमताचा आकडा गाठण्याच्या जवळ पोहोचला आहे. येत्या २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन सुरू असतानाच भाजपच्या राज्यसभेच्या जागांमध्ये तीनने भर पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी २४ जुलैला मतदान आहे. या तिन्ही जागा भाजप सहजपणे जिंकेल, अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन खासदारांच्या राजीनाम्यामुळे या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे भाजपच्या तीन जागा वाटत असतानाच विरोधकांच्या तीन जागा कमी होणार आहेत.

PM Narendra Modi
Manmohan Singh news : मी आत्महत्या करेन! माजी PM मनमोहन सिंग यांच्याबाबत तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांकडून मोठा खुलासा

राज्यसभेत हे तीन खासदार दाखल झाल्यानंतर भाजपच्या खासदारांची संख्या ११७ वर पोहोचेल. भाजपचा आतापर्यंतच्या इतिहासातील हा वरिष्ठ सभागृहातील सदस्यांचा उच्चांक असेल. तर एनडीएच्या खासदारांची संख्या १५२ वर पोहोचेल. राज्यसभेत बहुमतासाठी १२३ खासदारांची आवश्यकता असते. ता. २४ जुलैनंतर भाजपला हा आकडा गाठण्यासाठी केवळ सहा खासदारांची गरज असणार आहे.

PM Narendra Modi
BJP Legal Notice : भाजपकडून आमदारांना 20-30 कोटी, मंत्रिपदाची ऑफर..! विरोधी पक्षाने थेट मुख्यमंत्र्यांनाच अडकवलं कायद्याच्या कचाट्यात

राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८६ मध्ये काँग्रेसकडे राज्यसभेत एकहाती बहुमत होते. मात्र, त्यानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतासाठी १६६ ही संख्या आवश्यक आहे. सध्या एनडीएकडेही एवढे बहुमत नाही. त्यामुळेच काही महत्वाची विधेयके पारित करण्यासाठी विरोधी पक्षातील खासदारांसह अन्य दोन्ही आघाड्यांमध्ये नसलेल्या पक्षांची मदत घ्यावी लागते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com