Pune Vidhan Sabha Election Sarkarnama
पुणे

Khadakwasla Constituency : फटाके फोडले एकाने, गुलाल दुसऱ्यानेच उधळला; दोडकेंचा विजयाचा 'कॉन्फिडन्स' ठरला 'ओव्हर कॉन्फिडन्स'

Assembly Election 2024 : भीमराव तापकीर यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपमध्ये अंतर्गत विरोध पाहायला मिळाला भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी उमेदवार बदलावा अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली होती. मात्र...

Sudesh Mitkar

Pune News : यंदा खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा तिहेरी लढत झाली. महायुतीकडून तिसऱ्यांदा विद्यमान आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांना संधी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा आघाडी कडून सचिन दोडके यांना रिंगणात उतरवण्यात आलं होत. मात्र, माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना मनसेने निवडणूक रिंगणात उतरल्याने खडकवासल्यातील सामना अधिकच रंजक ठरला. मात्र खडकवासला हा भाजपाचा गड आहे हे मतदारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं.. Maharashtra Election Assembly 2024 Result news

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांना विजयाचा कॉन्फिडन्स दाखवत मतदान झाल्यानंतर सायंकाळी फाडके फोडत विजयी मिरवणूक काढली. तसेच मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे पोस्टरदेखील लावण्यात आले. सचिन दोडके यांचा हा विजयाचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स ठरला असल्याचं पाहायला मिळालं.

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 2011 ला पोट निवडणूक झाली. या पोटनिवडणुकीमध्ये भीमराव तापकीर हे पहिल्यांदा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर ते 2014 आणि 2019 ला ते पुन्हा निवडून आले. 2019 ला त्यांना अवघ्या अडीच हजार मतांनी विजय मिळाला यावेळी सचिन दोडके यांनी चांगली फाईट दिली होती.

भीमराव तापकीर यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपमध्ये अंतर्गत विरोध पाहायला मिळाला भाजपच्या (BJP) स्थानिक नगरसेवकांनी उमेदवार बदलावा अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली होती. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेते मंडळींनी पुन्हा एकदा भीमराव तापकीर यांच्यावर विश्वास दाखवला आणि भीमराव तापकीर यांनी चौकार मारला असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड बनला आहे. या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाला मानणारा मोठा मतदार आहे. मतदारसंघात आरएसएसचं संघटन मजबूत आहे. निवडणुकीत हे संघटन पूर्णपणे भाजपने ऍक्टिव्हेट केलं होतं. त्यामुळे तापकीर यांना 51 हजार 566 मतांनी विजय साकार करता आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT