Khalil Shaikh Death Case | Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; मृत्यूपूर्वी बनवला व्हिडीओ, धंगेकरांचं घेतलं नाव

Khalil Shaikh Death Case : खलील शेख आणि रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर हे उत्कर्ष असोसिएट्स या कंपनीत भागीदार होते. या कंपनीने पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील एका जागेच्या पुनर्विकासासाठी प्रकल्प हाती घेतला होता. या कंपनीत प्रतिभा धंगेकर, खलील शेख यांच्यासह एकूण पाच भागीदार होते.

Jagdish Patil

Pune News, 16 Jul : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी काही व्हिडिओ रेकॉर्ड केले असून, त्यामध्ये आर्थिक अडचणी, वाढते कर्ज आणि काही व्यक्तींना जबाबदार धरल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये माजी आमदार तथा शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांचेही नाव घेतल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, खलील शेख आणि रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर हे उत्कर्ष असोसिएट्स या कंपनीत भागीदार होते. या कंपनीने पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील एका जागेच्या पुनर्विकासासाठी प्रकल्प हाती घेतला होता. या कंपनीत प्रतिभा धंगेकर, खलील शेख यांच्यासह एकूण पाच भागीदार होते.

खलील शेख यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत, विविध कारणांमुळे आपण कर्जबाजारी झालो असून त्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच या आर्थिक संकटाला काही व्यक्ती कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांनी उत्कर्षा कंपनीचे पार्टनर रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी, सुनील आहेरांचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गावडे यांची नावे व्हिडिओत घेतली आहेत.

तर या प्रकल्पासंदर्भात वक्फ बोर्डाशी संबंधित जागेचा वाद निर्माण झाला होता. संबंधित जागेवरील बांधकामाला स्थगिती मिळाल्यानंतर प्रकल्प रखडला. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढला आणि आर्थिक व्यवहार अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी आपल्याला सुमारे ५० लाख रुपये भागीदारांकडून येणे असल्याचे म्हटले आहे.

रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकणावर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, संबंधित जागा चार ते पाच जणांनी मिळून खरेदी केली होती. प्रकल्पाला रेरा मान्यता मिळाली होती आणि महानगर बँकेकडून पाच कोटी रुपयांहून अधिक कर्जही मंजूर झाले होते.

धंगेकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर या प्रकल्पावर अडचणी सुरू झाल्या. संबंधित जागा वक्फ बोर्डाची असल्याची नोटीस मिळाल्याने काम थांबले आणि त्यामुळे आर्थिक नुकसान वाढले.

धंगेकर यांनी पुढे सांगितले की, जर ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचे सुरुवातीपासून स्पष्ट असते, तर बँकेने कर्ज दिले नसते आणि रेराकडूनही परवानगी मिळाली नसती. या प्रकरणात न्यायालयातही दाद मागितली होती आणि त्यातून दिलासा मिळाला होता. मात्र, प्रकल्प रखडल्यामुळे कर्ज वाढत गेले.

याशिवाय, काम थांबवा अशी नोटीस आल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्याची भेट घेतली होती. काम थांबल्यास अनेक लोक आत्महत्या करतील, त्यामध्ये माझाही समावेश असू शकतो, असं मी म्हणलं होतं. पण तो अधिकारी म्हणला वरून प्रेशर आहे. तसंच माढी आणि खलील शेख यांची प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही. आपण संबंधित साईटवर जात नव्हतो आणि २०२५ मध्येच पत्नी प्रतिभा धंगेकर यांची या प्रकल्पातील भागीदारी काढून घेतली होती, असा खुलासाही धंगेकर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT