पुणे

किरण गोसावीच्या असिस्टंटला अटक; गोसावी मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकणात पंच

२ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुंबई क्रुझ शिपवरील छापेमारीच्या प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे

सरकारनामा ब्युरो

पुणे : फसवणुकीच्या (Fraud) गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) असिस्टंटला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शेरबानो कुरेशी (Sherabano Kureshi) असे या महिला असिस्टंटचे नाव आहे. किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांची (Pune Police) दोन पथकं कार्यरत होती. या पथकांनी केलेल्या कारवाईत कुरेशीला ताब्यात घेण्यात आले. आज शेरबानो कुरेशीला कोर्टात हजर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मधे पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर गोसावीच्या विरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्हयात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतुन अटक केली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये किरण गोसावी विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

धक्कादायक म्हणजे, २ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुंबई क्रुझ शिपवरील छापेमारीच्या प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे. एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. पण तोच फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर, मुंबईमध्येही त्याने फसवणूक केल्याची दोन प्रकरणे समोर आली आहेत. किरण गोसावी नवी मुंबईच्या कार्यालयातून फसवणुकीचे रॅकेट चालवत होता.

- काय आहे हे प्रकरण?

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष आणि आदर्श यांची फेसबुकवरुन गोसावीशी ओळख झाली. त्याने या दोघा तरुणांना मलेशियाला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी गोसावीने त्यांच्याकडून दीड लाखांची मागणी केली. दोघांनीही गोसावीच्या बँक खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर गोसावीने दोघांनाही विमानाचे तिकीट आणि व्हिसा दिला. मात्र कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले, नाईलाजाने दोघेही पालघरला परतले आणि आपली फसवणूक झाल्याप्रकरणी दोघांनीही केळवा पोलिसात तक्रार दाखल केली.

- कोण आहे हा किरण गोसावी?

किरण गोसावी हा के.पी.जी ड्रिम्स रिक्रुटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. मुंबई आणि नवी मुंबईत या कंपनीची कार्यालये आहेत. गोसावी हा खासगी गुप्तहेर असल्याचेही सांगितले जाते. गोसावीच्या बड्या पोलिस अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहितीही समोर आली आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. गोसावीच्या विरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. मलेशियात नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्याने उत्कर्ष, आदर्श आणि चिन्मय यांच्याकडून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT