
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काश्मीरात (kashmir) दहशतवाद फोफावला आहे. अजूनही त्या ठिकाणी शीख, काश्मिरी पंडित, बिहारी नागरिकांच्या हत्या केल्या जात आहेत. काश्मीर आणि काश्मीरी नागरिकांची सुरक्षा ही केंद्र सरकार (Central Government) गृहमंत्रालयाची (Home Ministery) जबाबदारी आहे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी काश्मीरच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
तसेच, आता पाकिस्तानच्या बाबतीत धमक्यांची भाषा बोलून चालणार नाही, सर्जिकल स्ट्राईक करून शत्रुचे हल्ले थांबवता येणार नाही. दूसरीकडे चीननेही लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. त्यांच्यावरही सर्जिकल स्ट्राईकच करायला पाहिजे. अशी ठाम भुमिकाही त्यांनी घेतली आहे. काश्मीरमध्ये कलम 370 हटवून सुद्धा परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. तिथल्या परिस्थितीबाबत बातम्या बाहेर येऊ दिल्या जात नाहीत. तिथे गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद होती. अनेक बंधने घालण्यात आली होती, त्यामुळे तिथली माहिती समोर आली नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्रसरकार काय करतय हे गृहमंत्री अमित शहांनी समोर येऊन सांगावे”,असे राऊतांनी म्हटले आहे.
येत्या २४ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान क्रिकेट सामना आहे, याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “भारताने पाकिस्तानसोबत कसे संबंध प्रस्तापित करायचे याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आम्ही बोलू. तुम्ही दररोज तुमच्या स्वार्थाप्रमाणे आपल्या राजकीय सोईच्या भूमिका घेता, पण कश्मिरी जनता दररोज मरत आहे. कुठलेच संबंध ठेऊ नका आम्ही सातत्याने सांगत आहे. पण तुम्ही तिकडे जाऊन केक कापता गळा भेट घेता.''
महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रंणांकडून धाडी सत्र सुरु आहेत. मी या यंत्रणांना तिकडचे पुरावे देतो, ईडी, सीबीआय, एनसीबी या यंत्रणांना जम्मू काश्मीरलाही पाठवा. तपास यंत्रणा खूप शक्तिशाली आहेत ते तिकडे गेले तर दहशतवादीही पळून जातील. पण तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन राज्यसरकारवर हल्ले करत आहात. तपास यंत्रणांचा असा वापर करुन केंद्राने या संस्थाही बदनाम केल्या आहेत. आता आम्हीही दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देतो, किरीट सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा. ते जम्मू- काश्मिर फिरत बसतील. असंही यावेळी संजय राऊतांनी स्पष्ट केलं.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटलांचाही समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचा ज्या शब्दांमध्ये उल्लेख केला हे त्यांना शोभते का? चंद्रकांत पाटील कमी गांजा मारून बोलत आहेत, शरद पवारांची हिमालयाची उंची आणि हे कुठे टेंगुळ. असे म्हणत त्यांनी आघाडीतील नेत्यांनीही नुसत्या खुर्च्या उबवू नका, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.