Kirit Somaiya news:  Sarkarnama
पुणे

Kirit Somaiya News: सुजित पाटकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्या पुन्हा आक्रमक; काय आहे प्रकरण?

सरकारनामा ब्युरो

Kirit Somaiya on Pune Jumbo Covid Center: पुण्यातील कोरोना काळातील जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार सुजित पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. आज (१० एप्रिल) त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी पाटकर यंच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनीने कोणताही अनुभव नसताना पुणे जम्मू-कोविड सेंटरचा करार करुन मोठे गैरव्यवहार केले. नागरिकांच्या जीवाशी खेळ केला, असा आरोप सोमय्या यांनी केला. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी सात दिवसांच्या आत पाटकरांच्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा,असही त्यांनी म्हटलं आहे.

कोरोना काळात जुलै 2020 मध्ये शिवाजीनगर येथे जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले. मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईत आणि पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या वतीने जम्बो-कोविड सेंटर उभारण्यात आले. शिवाजीनगरचे कोविड सेंटर चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कडे देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ते सुजित पाटकर यांच्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.

त्यानंतर पीएमआरडीएने लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कॉन्ट्रॅक्ट दिले. मात्र, कॉन्ट्रॅक्ट करताना लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनीने पीएमआरडीएला, कंपनी केव्हा स्थापन झाली, अनुभवाची आणि तीन वर्षाचे टाळेबंद अशी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. कंपनीने फक्त एक प्रेझेंटेशन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्याचे दिसते. फक्त एका प्रेझेंटेशनवर 800 बेडचे जंबो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिले, ही गंभीर बाब असल्याचा दावाही सोमय्या यांनी यावेळी केला.

तसेच, पीएमआरडीए व टास्क फोर्सने बनवलेल्या सर्व नियमांकडेही दुर्लक्ष केले.आठ दिवसात शिवाजीनगर जंबो कोविड सेंटरमध्ये गोंधळ सुरू झाला.डॉक्टरांची कमतरता,अनुभवी डॉक्टर्स नाही, पॅरामेडिकल स्टाफचा अभाव, या सर्व गोष्टींमुळे रुग्णांचे हाल झाले. कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर २ सप्टेंबर २०२० रोजी पुणे महापालिकेने पीएमआरडीएला यासंबंधी तक्रार करत लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस मध्ये क्षमता नसतानाही काम सुरुच ठेवल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याचं यावेळी सांगितलं. या प्रकरणी आता लाईफ लाईनवर एफआयआर दाखल करावी अशी मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT