Kothrud Assembly Election 2024 Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सकाळपासून राज्यभरातील विधानसभा मतदारसंघात कोणते उमेदवार आघाडीवर आणि पिछाडीवर आहेत याबाबतचे कल समोर येऊ लागले आहेत. (Vidhan Sabha Election 2024 result live news)
मात्र, शेवटच्या फेरीनंतरच कोणत्या उमेदवाराचा विजय होणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. अशातच सुरुवातीची मतमोजणी सुरू असतानाचभाजप नेते आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी महायुतीला राज्यात 160 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, "कोथरूडमध्ये फक्त लीड किती आहे ते मोजायचं आहे. राज्यात 160 पेक्षा जास्त जागा महायुतीला (Mahayuti) मिळणार आहेत. विधानसभेच्या निकालानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल.
राज्यात लोकसभेनंतर केलेली कामे आणि विविध योजनांचा विधानसभेच्या निकालात फायदा झाल्याचं दिसत आहे. विरोधकांनी चुरस निर्माण केल्याचा प्रयत्न केला पण तसं झालं नाही", असा दावा पाटील यांनी यावेळी केला.
तर पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील जवळपास 7 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. तर पोस्टल मतांमधून ते आघाडीवर होते. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शिवनेसा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे उभे आहेत. (Maharashtra Election Assembly 2024 news)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.