Pune Crime news.jpg Sarkarnama
पुणे

Pune Crime: 'ते' दोन अहवाल अन् पुण्यासह राज्यात खळबळ उडवणाऱ्या कोथरूड मारहाण प्रकरणाचं पितळ उघडं

Pune Kothrud Police Case : कोथरूडमध्ये घडलेल्या तरुणींवरील कथित मारहाण प्रकरणात पोलिसांकडून कोणताही बेकायदेशीर प्रकार किंवा हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आले नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे पोलिसांवर मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा मुलींकडून करण्यात आलेल्या आरोप प्रकरणात आता दोन अहवाल समोर आले आहेत. या अहवालामुळे या प्रकरणात अधिक स्पष्टता असल्याचं सांगितलं जात आहे.

पहिला अहवाल हा संबंधित मुलींच्या ससूनच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आहे तर दुसरा अहवाल पुणे पोलिसांकडून (Pune Police) याप्रकरणात हलगर्जीपणा किंवा बेकायदेशीर वर्तन झालेय का? याची चौकशी Acp दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात अली याबाबतचा अहवाल आज पुणे पोलीस आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

काय आहे प्रकरण..?

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला, आपल्या पतीकडून होणाऱ्या वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या महिलेला मदत करणाऱ्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान करण्यात आला. असा आरोप या मुलीकडून करण्यात आला आहे.

अहवाल काय सांगतो..?

कोथरूडमध्ये घडलेल्या तरुणींवरील कथित मारहाण प्रकरणात पोलिसांकडून कोणताही बेकायदेशीर प्रकार किंवा हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आले नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर, आज संबंधित अहवाल आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

दरम्यान, मिसिंगची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास पूर्णपणे कायदेशीर मार्गाने आणि नियमानुसार केला होता, असेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून बेकायदेशीर वर्तन किंवा जबाबदारीतील कसूर झाल्याचा कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही.

तसेच या प्रकरणात तरुणींनी कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यासंदर्भात ससून रुग्णालयात पीडित मुलींची 2 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5.40 वाजता वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या निरीक्षणात स्पष्ट नमूद केले आहे की, तपासणी करण्यात आलेल्या मुलीच्या शरीरावर कोणतीही ताजी दुखापत आढळून आलेली नाही. त्यामुळे दोन्ही अहवाल पोलिसांना दिलासा देणारे असल्याचा सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT