Pune Police : 'तुम्ही रां***, तुमची जात....', पुणे पोलिस तरुणींना नको नको ते बोलले, डांबून ठेवलं, सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे चौकशीची मागणी

Kothrud Police Accused of Misbehaving with Women :  संभाजीनगरमधून निघून आलेल्या महिलेने सांगितले की, पती अक्षय याच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आणि माझे पुढील करियर बनवण्याकरिता पुणे शहरात आली.
MP Supriya Sule demands probe against Kothrud police after alleged misconduct and casteist abuse of young women.
MP Supriya Sule demands probe against Kothrud police after alleged misconduct and casteist abuse of young women.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कोथरुडमध्ये भाड्याने राहणाऱ्या तीन तरुणांच्या खोलीवर जात त्यांना जबरदस्तीने पोलिस ठाण्यात आणत त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पुणे पोलिसांवर होत आहे. श्वेता एस व्ही यांनी कोथरुड पोलिस ठाण्याच्या बाहेरून फेसबूक लाईव्ह करत पोलिसांवर गंभीर आरोप केले.

'तू महार मांगाची आहेस म्हणून असं वागतेस. तुम्ही रां**आहात. ', असे पीएसआय प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलिस स्टेशनच्या कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, पीएसआय अमोल कामटे यांनी तरुणांना म्हणत पोलिस स्टेशनमधील एका खोलीत पाच तास डांबून ठेवल्याचा आरोपी देखील श्वेता यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळले

या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला 'व्हॉट्सॲप'वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

संभाजीनगरमधील एक महिला बेपत्ता होती. त्यासंदर्भात संभाजीनगरमधील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती महिलेच्या तपासाठी संभाजीनगरमधून पोलिस पुण्यात आले होते. ती महिला कोथरुडमधील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणींच्या रुमवर गेल्याची माहिती होती. श्वेता यांनी त्या महिलेला कोंढवा येथील सखी वन्स स्टाॅपसेंटरमध्ये दाखल केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी रुममधील दोन मुलींना ताब्यात घेतले तसेच त्या रुममध्ये राहणाऱ्या आणखी एका मुलीला तिच्या कामाच्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याशी गैरवर्तन केले.

महिला काय म्हणाली?

दरम्यान, संभाजीनगरमधून निघून आलेल्या महिलेचा जबाब पोलिसानी घेतला. तीन वन स्टाॅपसेंटरमध्ये होती. तिने सांगितले की, पती अक्षय याच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आणि माझे पुढील करियर बनवण्याकरिता पुणे शहर येथे माझ्या मर्जीने व स्वखुशीने कोणास काही एक न सांगता निघून आलो. यापुढे पती अक्षय व तिचे आई-वडील यांच्याकडे देखील जायचे नाही. हा निर्णय तिच्या मर्जीने घेतलेला आहे. यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही.

MP Supriya Sule demands probe against Kothrud police after alleged misconduct and casteist abuse of young women.
Maharashtra Congress : काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत श्रीरामपूरला 'लॉटरी' अन् 'मोठी जबाबदारी'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com