Sharad Mohol Latest News Sarkarnama
पुणे

कोथरूडचा कुख्यात गुंड शरद मोहोळ तडीपार; पुणे पोलिसांनी दिला आदेश

Sharad Mohol | Crime News : गुंड शरद मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोथरूड भागात दहशत असलेला गुंड शरद मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिला. शरद हिरामण मोहोळ (वय ३८, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. (Sharad Mohol Crime News)

टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोहोळला गेल्या वर्षी जामीन मंजूर केला होता. कारागृहाबाहेर आल्यानंतर मोहोळ आणि साथीदारांनी दहशत गाजविण्याचे गुन्हे केले होते.

मोहोळला शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी तयार केला. त्यानंतर मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT