Chandrashekhar Guruji: कर्नाटकातील हुबळीत धक्कादायक घटना घडली आहे. 'सरल वास्तू'चे संस्थापक (Saral Vastu) चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांची चाकूचे सपासप वार करुन हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हॉटेलच्या रिसेप्शनजवळ त्यांची चाकूनं वार करत हत्या केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ( Karnataka Crime news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांची आज मंगळवारी (ता.5 जुलै) दुपारी १२ वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला आणि हल्ल्यानंतर हे दोघेही तिथून पळून गेले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी लगेच या घटनेचा तपास सुरू केला असून चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओनुसार, हॉटेलच्या लॉबीत दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजींचे चरण स्पर्श केल्यानंतर त्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. या गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोर पसार झाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर यांच्या विरोधात काही कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासाठी आंदोलन केले होते. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा यात काही सहभाग तर नाही ना या अनुषंगानेही पोलीसांनी तपास सुरू केला आहे. गुरुजी हे 3 जुलैपासून हुबळीतील हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाचा मृत्यू झाल्यामुळे ते हुबळीला आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली आणि पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने तपासाचे निर्देश दिले आहेत. चंद्रशेखर गुरुजींनी कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे त्यांना मुंबईत नोकरी लागली होती. त्यानंतर त्यांनी वास्तू विषयाचं काम सुरू केले होते. या प्रकरणाचा तपास पोलिस करत असून नेमकी हत्या कश्यामुळे करण्यात आली हे तपासातूनच काय समोर येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.