Pune News, 01 July : मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. कृष्णराव भेगडे यांन शिक्षणमहर्षी आणि मावळ भूषण या उपाधींचा सार्थ मान मिळवला होता. त्यांच्या जाण्याने मावळ आणि पंचक्रोशीत शोक व्यक्त केला जात आहे.
सोमवार (ता. 30 जून) रोजी रात्री 9 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवारी सकाळी 11 वाजता लेख पॅराडाईज या राहत्या घरापासून निघणार आहे. तर अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार असल्याची माहिती भेगडे कुटुंबियांनी दिली आहे.
भेगडे हे 1972 मध्ये मावळात जनसंघाचे आमदार होते. 1977 ला त्यांनी कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला होता. नंतर ते 1978 ला पुन्हा विधानसभेवर निवडून आले होते. 1992 आणि 1994 असे दोनदा ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. शरद पवार हे संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन केंद्रातून पुन्हा राज्यात मुख्यमंत्री झाले.
शरद पवार यांच्यासाठी भेगडे यांनी आपल्या विधान परिषदेच्या जागेचा राजीनामा दिला होता. नंतर पुन्हा त्यांना विधानपरिषदेवर 1994 ला घेण्यात आले. ती टर्म संपली आणि त्यांनी राजकारणातून 2000 साली निवृत्ती घेतली. चार टर्म आमदार राहिलेल्या भेगडे हे निवृत्तिनंतरही शरद पवारांसोबत राहिले.
दरम्यान, भेगडे यांच्या जाण्याने मावळच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. कारण त्यांनी राजकारणासह शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये उघडले. त्यांच्या याच कार्यामुळे आणि लोकसेवेमुळे त्यांना शिक्षणमहर्षी, मावळ भूषण या उपाधींनी सन्मानित करण्यात आलं होतं.
तसंच आपल्या संयमी नेतृत्वामुळे आणि कार्यक्षमतेमुळे ते सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान राखून होते. कृष्णराव भेगडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. संघाच्या विचारसरणीवर आधारित भारतीय जनसंघ पक्षात त्यांनी राजकारणाची कारकीर्द सुरू केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.