Eknath Shinde : शिंदेंचा थेट इशाराच! गोगावलेंसह आमदार आणि मंत्र्यांना कानपिचक्या, म्हणाले, 'तुमचा एक चुकीचा शब्द...'

Eknath Shinde On Bharat Gogawale : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी भाजप खासदार नारायण राणे यांच्यासंदर्भात धक्कादायक विधान केलं होतं. यामुळे राज्यभर तीव्र पडसाद उमटल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी, अशी तंबी गोगावले यांना देण्यात आल्याची माहिती आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तथा काही आमदार सतत वादग्रस्त आणि धक्कादायक विधाने करत असतात. या विधानांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. तर या वक्तव्यांमुळे अनेकदा भाजपसह राष्ट्रवादीशीही (अजित पवार) राजकीय संबंध ताणले गेले आहेत. आता मंत्री भरत गोगावले यांनी देखील काही दिवसांपूर्वी भाजप खासदार नारायण राणे यांच्यासंदर्भात केलेल्या धक्कादायक विधानानंतर तीव्र पडसाद उमटले. ज्यामुळे सिंधुदुर्गसह राज्यात आधी माफी मागा मगच महायुचीचे बघू असा इशारा भाजपने दिला. यामुळे आता याची दखल आता खुद्द शिवसेनेचे प्रमुथ तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी गोगावलेंचे कान टोचलेच आहेत. शिवाय आमदार आणि मंत्र्यांना देखील दिल्या कानपिचक्या दिल्या आहेत. ज्याची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. ते शिवसेनेच्या कार्यकारणीची बैठक बोलत होते. (Bharat Gogawale's statement on Narayan Rane causes alliance rift, Shinde intervenes)

या बैठक अनेक ठरावांसह खासदार श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन, जातीय जनगणना निर्णयाचे अभिनंदन, मराठी अस्मितेबाबतचा ठरावासह शिंदे यांची पक्षप्रमुख पदी नियुक्ती करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी कार्यकारिणीला मार्गदर्शन केलं.

यावेळी शिंदे यांनी, आपल्याला कोणतं पद द्यायचं यात पदाधिकाऱ्यांचंच एकमत नाही. ते आधी करा. तोपर्यंत मला कोणतेच पद नको. पदं येतात जातात. त्यामुळे मी कार्यकर्ता आणि लाडका भाऊ या सर्वात मोठ्या पदात खूश आहे. सध्या आपल्या कार्यकारिणीत काही शिवसेना ‘पक्षप्रमुख’ तर काही शिवसेना ‘राष्ट्रीयप्रमुख’ असं नाव द्यावं अशीही काहींची इच्छा आहे. पण काय नाव असावं ते आधी ठरवा, असे म्हटलं आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde Shivsena: ठाकरेंनी दुखावलेल्या तडफदार नेत्याला राजेश क्षीरसागरांनी हेरलं; मुंबईत फिरलं कोल्हापूरचं राजकारण

दरम्यान राज्यात शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांकडून होणाऱ्या विविध वक्तव्यावरून त्यांनी सर्वांना कानपिचक्या दिल्या. शिंदे यांनी यावेळी कमी बोलू आणि जास्त काम करू, हेच आपल्यासाठी चांगलं आणि महत्वाचं आहे. फक्त विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः तेवढं एक्स्पोज होऊ नका, उघडं पडू नका, असे म्हटले. त्यांचा सगळा रोख हा गोगावलेंच्या वक्तव्यामुळे होणाऱ्या टीकेकडे होता.

Eknath Shinde
Eknath Shinde On Uddhav Thackeray : विरोधी पक्षनेतेसाठी महाराष्ट्रानं संख्याबळचं दिलं नाही; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचताना टायमिंग साधलं

तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढं मोठं यश मिळवलं. पण एका चुकीच्या शब्दामुळे ते घालवू नका. आपल्या पक्ष शिस्तीला तडा जाईल असं काही करू नका. केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज होईल असं काम करा. जास्त ऐका आणि कमी बोला, अशाही सूचना एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com