Kukdi Canal Rotation  Sarkarnama
पुणे

Chandrakant Patil ON Kukdi Canal Rotation : कर्जतकरांना चंद्रकांतदादांकडून दिलासा ; कुकडीचे आवर्तन सोडणार..

Kukdi Canal Rotation : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar : पुण्याचे पालकमंत्री, कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्जतकरांना दिलासा दिला आहे. कर्जतसाठी कुकडी कालव्याचे आवर्तन सोडण्याचा आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. आमदार राम शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. कुकडीचे आवर्तन सोडल्याने खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे.

कुकडी लाभक्षेत्रातील शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या ठिकाणी यावर्षी पाऊस कमी झालेला आहे. जूलै महिना संपत आला तरी या भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे जनतेला पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत जनतेला दिलासा मिळावा, यासाठी राम शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची शुक्रवारी भेट घेऊन आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. चंद्रकांत पाटील यांनी तातडीने या मागणीची दखल घेतली आणि आवर्तन सोडण्याचा आदेश दिला.

तालुक्यात पाऊस कमी झाल्याने तातडीने कुकडी डावा कालव्यातून आवर्तन सोडण्याची आवश्यकता आहे. कुकडीचे आवर्तन तातडीने सोडल्यास या भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. ही बाब राम शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून देत आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.

राम शिंदे म्हणाले, "चंद्रकांत पाटलांनी आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन कुकडीच्या मुख्य अभियंत्यांना तात्काळ कुकडीचे आवर्तन सोडण्याचा आदेश दिला आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी हे आवर्तन सुटणार आहे. या आवर्तनामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या दुर होणार आहे."

यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या समवेत आमदार सुरेश धस, कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य काकासाहेब धांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, नितिन पाटील, महेश तनपुरे, अनिल गदादे, प्रविण फलके आदी यावेळी उपस्थित होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT