Telangana Model News : महाराष्ट्रातील शेतकरी-कार्यकर्ते जाणून घेणार काय आहे 'तेलंगणा मॉडेल'

BRS News : देशातील सर्वाधिक सुखी शेतकरी हा तेलंगणात आहे, असे मुरकुटे म्हणाले.
Telangana Model BRS News
Telangana Model BRS News Sarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

भारत राष्ट्र समिती म्हणजे 'बीआरएस'ने तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजना पाहण्यासाठी (तेलंगणा मॉडेल) महाराष्ट्रातील पक्षाचे कार्यकर्ते तेलंगणात जाणार आहे, अशी माहिती बीआरएसचे राज्य कार्यकारणी सदस्य माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि घनश्याम शेलार यांनी दिली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस हा पक्ष आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्याय असल्याचं मुरकुटे आणि शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

Telangana Model BRS News
Eknath Shinde big decision : वसई, विरार, डहाणुकरांसाठी गुड न्यूज ; मेट्रोबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

बीआरएस पक्षाच्या वतीने राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा आणि विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात बैठका, सभा घेऊन तेलंगणा मॉडेलचा प्रचार करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

तेलंगणा राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा केला जातो. बियाणे आणि खतांसाठी अनुदान दिले जाते. मुलीच्या लग्न कार्यासाठी एक लाख रुपये तसेच प्रत्येक शेतकऱ्याचा पाच लाखाचा विमा सरकारने काढला आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक सुखी शेतकरी हा तेलंगणात आहे, असे मुरकुटे म्हणाले.

Telangana Model BRS News
Rashtrapati Bhavan : साई संस्थानचे आचारी राष्ट्रपतींसाठी मराठमोळे चविष्ट जेवण बनवणार..

तेलंगणात कालेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून ६०० टीएमसी पाणी नदीच्या वेगवेगळ्या टप्प्यात अडवण्यात आले आहे. बोगदे आणि कालव्यांद्वारे हे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर पाणी योजनेच्या माध्यमातून माणसी 100 लिटर पाणी उपलब्ध केले जाते. त्याचबरोबर शेतीला मोफत वीज दिल्यामुळे आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळे तेलंगणातील शेतकरी सुखी झाला आहे. आता महाराष्ट्रासाठी बीआरएस हाच योग्य पर्याय असल्याचा विश्वास मुरकुटे आणि शेलारांनी व्यक्त केला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com