Kundmala Bridge Collapses  sarkarnama
पुणे

Kundmala Bridge Collapses : पर्यटकांचे जीव वाचले असते, कुंडमळा पूलावर 'ती' चूक केली अन्...

Kundmala Bridge Tourist : दुर्घटनेमधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Roshan More

Kundmala Bridge Collapses Update : मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूलावर पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र, पूलाच्या क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक पूलावर जमल्याने पूल कोसळला. त्यामुळे तब्बल 40 पर्यटक वाहून गेले. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पूलावर तब्बल 100 पर्यटक थांबले होते. पर्यटकांनी एक चूक केली अन्यथा त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा आता सुरू आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, पूल जीर्ण झाल होता. त्याच्य दुरुस्तीसाठी सात ते आठ कोटीचे टेंडर देखील काढण्यात आले आहे. मात्र, काम सुरू झाले नव्हते. पूल धोकादाक असल्याचे फलक पूला जवळ लावले होते. मात्र, पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अन् ते पुलावर गेले. क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक तेथे जमल्याने ही दुर्घटना घडल्याचे देखील महाजन यांनी सांगितले.

पूल धोकादायक असल्याचे फलकाकडे पर्यटकांनी दुर्लक्ष केले नसते तर त्यांचा जीव वाचला असता अशी आता चर्चा आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

रुग्णालयात जखमींवर उपचार

दुर्घटनेमधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे, अशी माहिती प्रशाकडून देण्यात आली आहे.

बचाव कार्यात अडथळे

एनडीआरएफद्वारे बचावकार्य राबवण्यात येत आहे. पूलाखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. अंधारामुळे त्यामध्ये अडथळे येत आहेत. पूलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात एकूण 03 व्यक्ती अडकल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT