BJP national president : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेपूर्वी करण्यात येणार घोषणा?

BJP leadership update News : देशभरातील 10 राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे.
Bjp flag
BJP flagSarkarnama
Published on
Updated on

New Delhi news : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सध्या वेगाने सुरु आहे. या वर्षाअखेरीस बिहार विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीपूर्वी भाजपला नवा अध्यक्ष मिळणार आहे. पहिल्यांदा देशभरातील 10 राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैला सुरु होणार आहे. हे आधिवेशन सुरु होण्यापूर्वी भाजपच्या (BJP) नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यात येणार असल्याचे समजते. या निवडी प्रक्रियेला पुढील आठवड्यापासून वेग येणार आहे. लोकसभा निवडणूका झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मुदत संपल्यानंतर नवा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्याकडे केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Bjp flag
Kundmala Bridge Collapses : इंद्रायणीवरील कुंडमळ्याजवळील पूल कोसळला, दोन पर्यटक दगावले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

अध्यक्षपदासाठी ही दोन नावे चर्चेत

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुरुवातीला चार जणांची नावे होती. मात्र, आता त्यामधून दोन नावे कमी झाली आहेत. सध्या धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव या दोन नावांची चर्चा जोरात सुरु आहे. मात्र, दोघांचा अनुभव पाहता धर्मेंद्र प्रधान यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे आता लवकरच भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

Bjp flag
Indrayani River Bridge Collapsed update : कुंडमळा पूल दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, पुलाबाबत अजितदादांनी दिली महत्वाची माहिती...

गेल्या वर्षभराच्या काळात महाराष्ट्रासह दिल्लीतील विधानसभा निवडणूक पार पडली होती. त्यावेळेसपासून निवडीची प्रक्रिया रखडली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसर आता 21 जुलैपूर्वी नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. आता ही निवड पुढे ढकलली जाणार नाही.

Bjp flag
Indrayani River Bridge Collapsed : इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यातील पूल कोसळण्याचे धक्कादायक कारण आले समोर !

येत्या काळात बिहार विधानसभेची निवडणूक हॊणार आहे.15 ऑगस्टनंतर बिहार निवडणुकीच्या चर्चेला वेग येणार आहे. त्यामुळे बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वीच नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा करण्यात येणार आहे.

Bjp flag
Ajit Pawar, Fadnavis : सकाळी अजितदादा संतापले अन् दुपारी सीएम फडणवीसांची थेट घोषणाच

सध्या दहा राज्यातील प्रदेश अध्यक्षाची निवड रखडली आहे. त्यांची घोषणा 21 जूनपर्यंत केली जाणार आहे. त्यानंतर महिनाभरातच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

Bjp flag
NCP Politics: 'होम पिच'वरच शरद पवारांना धक्का? अजितदादा मोठा डाव टाकण्याच्या तयारीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com