Lalit Patil Drugs Case Sarkarnama
पुणे

Lalit Patil Drugs Case : कसा होता ललित पाटीलचा ससून ते नाशिक प्रवास; असा आखला होता प्लॅन ?

Lalit Patil Drugs Case : ड्रग्जमाफिया ललित पाटील अमली पदार्थ नियंत्रण शाखेने आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे.

अनुराधा धावडे

Pune Crime News : ड्रग्जमाफिया ललित पाटील अमली पदार्थ नियंत्रण शाखेने आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी आठ पोलिस शिपायांना निलंबित करण्यात आले, पण ससूनमधून पळून जाताना त्याने कोणता प्लॅन केला होता, यासाठी त्याला कोणी मदत केली, याची माहिती आता समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातच ललितने पळून जाण्याचा प्लॅन आखला. यासाठी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना आणि ललितने मिळून पळून जाण्याचा प्लॅन केला. ससूनमधील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये ललितवर उपचार सुरू होते. याच ठिकाणी ललितची अऱ्हानाशी ओळख झाली. २ ऑक्टोबरला ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला. तिथून तो एका रिक्षाने सोमवार पेठेत पोहाेचला. तिथे ललितचा साथीदार दत्ता डोके हा त्याला घेऊन जाण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन थांबला होता.

दत्ता डोके अऱ्हाना याच्याकडे चालक म्हणून काम करायचा. डोकेने ललितला मोटारीतून रावतेला पोहाेचवले. अऱ्हानाच्या सांगण्यावरून डोके याने ललितला १० हजार रुपयेदेखील दिले. ते घेऊन ललित मुंबईत दाखल झाला. तिथून तो पुन्हा नाशिकला गेला. नाशिकच्या मैत्रिणीकडून त्याने पाच लाख रुपये घेतले आणि पुढचा प्लॅन आखला.

धक्कादायक म्हणजे पळून जाण्याच्या एक दिवस आधीच एका संशयित व्यक्तीने ससून रुग्णालयात त्याची भेट घेतली होती. इतकेच नव्हे, तर ससूनच्या वॉर्डमध्ये असतानाच एका संशयित व्यक्तीने त्याला मोबाईल फोनही दिला होता. याच फोनवरून तो त्याच्या साथीदारांशी संपर्क साधायचा. या प्रकरणी आतापर्यंत दोन पोलिस अधिकाऱ्यांसह आठ पोलिस शिपायांचे निलंबन करण्यात आले आहे.

Edited By Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT