Guruvarya Baburao Jagtap Sarkarnama
पुणे

PMC News: पेट्रोलचा कोटा जास्त वापरल्यानंतर पालिकेत पायी जाणारे महापौर तुम्हाला माहीत आहे का? टेलिफोनचे अतिरिक्त बिल भरायचे....

Late Former Pune Mayor Guruvarya Baburao Jagtap: त्यांच्या घरात महापालिकेचा टेलिफोन बसवलेला होता तो खासगी कामासाठी वापरला तर त्यासाठी त्या गल्ल्यामध्ये 15 ते 25 पैसे टाकायची व्यवस्था त्यांनी तयार केली होती व ते पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा करीत असत.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 'भावी नगरसेवकां'च्या अर्जावर नजर टाकली तर आपल्याला, त्यांची संपत्ती आणि आलिशान गाड्याची माहिती मिळते. यावेळी पुण्याच्या दिवंगत माजी महापौरांची आठवण आपल्याला येते.

बाबुराव जगताप ( Baburao G. Jagtap) हे पुण्याच्या इतिहासात एक आदरणीय सामाजिक कार्यकर्ता, शिक्षणप्रेमी आणि महापौर म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते. 'गुरूवर्य बाबूरावजी जगताप' या नावाने ते प्रसिद्ध होते. पुण्याच्या मामलेदार कचेरीच्या आवारात त्यांचा पुतळा आहे.

1962 मध्ये नागरी संघटनेकडून ते पुण्याच्या महापौरपदी विराजमान झाले होते. त्या काळामध्ये महापौरांना गाडी आणि पेट्रोलचा कोटा असायचा. महापौरपदी असताना बाबूराव जगताप यांच्याकडून महापालिकेचा पेट्रोलचा कोटा जास्त वापरला गेला. त्यामुळे त्यांनी पुढील सहा महिने जोपर्यंत कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत महापौरांची गाडी वापरली नाही. किंबहुना ते ऑफिसमधून घरी आणि घरातन ऑफिसला गाडीत न जाता पायी चालत जात असत.

टेलिफोन

त्याशिवाय त्यांच्या घरात महापालिकेचा टेलिफोन बसवलेला होता तो खासगी कामासाठी वापरला तर त्यासाठी त्या गल्ल्यामध्ये 15 ते 25 पैसे टाकायची व्यवस्था त्यांनी तयार केली होती व ते पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा करीत असत. आता बोगस बिले काढून फ्लेक्स लावणारे 'माननीय' तयार झाले.

प्रार्थना समाज

बाबूराव जगताप यांनी अनेक संस्था आणि समित्यांमधील महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. प्रार्थना समाजाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा स्कूलबोर्डाचे अध्यक्ष, लोकशिक्षण समितीचे अध्यक्ष, बालवीर चळवळेचे प्रमुख, श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या कारभारी मंडळाचे सदस्य ते होते.

श्री शिवाजी मराठा सोसायटी

बडोद्या येथील सरकारची नोकरी सोडून त्यानी १९१८ मध्ये शुक्रवार पेठेत ‘श्री शिवाजी मराठा शाळा’ सुरू केली. सुरुवातीला या शाळेत फक्त ३० विद्यार्थी होते, परंतु त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शाळा सुरु ठेवली.

पुढे 'श्री शिवाजी मराठा सोसायटी' आणि 'मराठा स्टुडंट्स ब्रदरहूड', 'महाराष्ट्र हितचिंतक भ्रातृमंडळ' या संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यांनी ‘शिक्षक’ नावाचे मासिक १९२० मध्ये सुरू केले आणि ते ४४ वर्षे अखंडपणे चालविले . तरुण विद्यार्थ्यांसाठी ‘मन्वंतर वाचनमाला’सुरु केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT