Central Election Commission, Asim Sarode Sarkarnama
पुणे

Election Commission News : निवडणूक आयोगाने मोठी चूक केली; असिम सरोदे स्पष्टच बोलले

Asim Sarode News : या निर्णयावर वकिल असिम सरोदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Central Election Commission News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिले आहे. या निर्णयावर वकिल असिम सरोदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या संदर्भात फेसबूक पोस्ट केली आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये सरोदे म्हणाले, पक्षाची ताकद न तपासता निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे तो निर्णय विवादास्पद आहे व बेकायदेशीर ठरू शकणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 2018 मधील शिवसेना पक्षांतर्गत झालेल्या सुधारणा निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या होत्या, असा दवा सरोदे यांनी केला आहे.

कागदपत्रांवरून दिसते पण हा मुद्दा निवडणूक आयोगाने कदाचित मुद्दाम चुकीच्या पद्धतीने मांडला व त्यामुळे त्याच्याआधारे पुढचा चुकीचा निर्णय घेतला. 2018 मधील पक्षीय मिटिंगमध्येच एकनाथ शिंदे यांची नेमणूक शिवसेना नेते म्हणून झाल्याचे त्या मिटिंगच्या व्हिडिओ वरून दिसते. मात्र, 2018 मधील शिवसेनेची सुधारणा बेकायदेशीर ठरवणाऱ्या निवडणूक आयोगाने त्याच मीटिंगमध्ये महत्वाचे पद देण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांना कायदेशीर कसे ठरवले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

पक्षात फूट झाली आहे असे निवडणूक आयोगाचे मत सुद्धा बेकायदेशीर आहे. कुणी पक्ष सोडलाच नाही असे जर म्हटले जात आहे तर फुट कशी? फूट हे अपात्र ठरण्यापासूनचे कारण ठरूच शकत नाही, कारण फुटीचा बचाव 10 व्या परिशिष्टातून व कायद्यातून काढूनच टाकला आहे. निवडणूक आयोगाने मोठी चूक केली आहे, असेही सरोदे म्हणाले.

जर फूट आहे असे आयोगाचे मत आहे तर मग एकनाथ शिंदे यांच्या गटाने इतर पक्षात सहभागी होणे आवश्यक आहे. पण तसे झालेले नाही. मग याचाच अर्थ ज्यांनी आधी पक्ष सोडला तो एक गट व उरलेले आमदार यांचा वेगळा गट असे मान्य केले. तर आता ठाकरे गटासमोर मोठे चॅलेंज आहे की, ठाकरे गटातील आमदारांना ते इतरांपासून वेगळे आहेत असे न्यायालयाकडून जाहीर करून घ्यावे लागेल...तसे झाले तर शिंदे गटाचा व्हीप त्यांच्यावर लागू होणार नाही. कायद्याचा गैरवापर सत्तेच्या दबावाखाली किती वाईट पद्धतीने करता येतो, हे निवडणूक आयोगाने दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT