Shivsena : ठाकरेंना आणखी एक धक्का; विधीमंडळ कार्यालयपाठोपाठ आता संसदेतील कार्यालयही शिंदे गटाकडे

विधानभवनातील शिवसेना (ShivSena) पक्ष कार्यालयानंतर, संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय सुद्दा शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आले.
Parliament
ParliamentSarkarnama

Shiv Sena News : विधानभवनातील शिवसेना (ShivSena) पक्ष कार्यालयानंतर, संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय सुद्दा शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आले. शिंदेगटाचे नेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना पत्र लिहून लोकसभेच्या उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर संसदेतील कार्यालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरण्यात येत होते. वादानंतरही दोन्ही गट या संसदेतील एकाच पक्ष कार्यालयात बसत होते. मात्र, आता ही मालकी पूर्णपण लोकसभा सचिवालयाने शिवसेना शिंदे गटाला दिले.

Parliament
BJP News; भाजपच्या खासदारांनी `या`साठी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!

जो प्रकार सोमवारी विधानसभेच्या पक्ष कार्यालयात होताना दिसला, तोच प्रकार आज संसदेच्या बाबतीत देखील झाला. संसदेतील शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट पाहायला मिळत आहेत.

दोन्ही गटांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. तसेच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दररोजच झडत आहेत. तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली व तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर विधानसभेतील आणि लोकसभेतील कार्यालय देखली त्यांना देण्यात आले आहे.

Parliament
Supreme Court hearing : पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयातही; सिब्बलांचा महत्त्वाचा प्रश्न

सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. न्यायालयात ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत. त्यांनी युक्तीवादादरम्यान, अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com