Laxman Hake Sarkarnama
पुणे

Laxman Hake : "भाजपला पाठिंबा देणं ही चूकच, आता ओबीसींच्या हक्कांसाठी..."; लक्ष्मण हाकेंनी पक्षाचा पुढील अजेंडा केला जाहीर

OBC Janata Party : मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन आपली चूक झाली. या निर्णयाचा पश्चात्ताप म्हणून आणि ओबीसी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी नवा पक्ष उभा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sudesh Mitkar

Pune News, 20 Jul : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असून, नवा राजकीय पर्याय राज्यातील जनतेसमोर ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कालपासून आपल्याला राज्यभरातून अनेक फोन आले असून, जनतेला एका नव्या पर्यायाची गरज असल्याचे सांगत त्यांनी मुंबईत लवकरच पक्षाची मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

भाजपला पाठिंबा देणे ही चूक; पश्चात्तापातून नव्या पक्षाचा जन्म

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन आपली चूक झाली. या निर्णयाचा पश्चात्ताप म्हणून आणि ओबीसी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी नवा पक्ष उभा करत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पक्षाचे नाव 'ओबीसी जनता पार्टी' असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पक्षाच्या रचनेबाबत बोलताना हाके म्हणाले, "पक्षाचा अजेंडा घरात बसून ठरवला जाणार नाही, तर राज्यातील सर्व घटकांना आणि लोकांना एकत्र आणून लोकशाही मार्गाने तयार केला जाईल. येत्या एक-दोन महिन्यांत नव्या पक्षाची अधिकृत तारीख आणि पुढील दिशा स्पष्ट केली जाईल. या पक्षात १०८ जणांची कार्यकारिणी असेल आणि येणाऱ्या काळात जे जे सोबतीला येतील, त्या सर्वांना सोबत घेतले जाईल."

हाके पुढे म्हणाले, अधिवेशनात जनतेच्या ऐवजी केवळ 'पेपर फुटी' आणि 'खासदार फुटी' यावरच जास्त चर्चा रंगली. विद्यार्थ्यांचे न्याय्य आंदोलन सत्ताधाऱ्यांकडून दडपले जात आहे. सोनम वांगचुक ही या देशाची मालमत्ता आहेत.

नीट पेपर फुटी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, ही त्यांची मागणी रास्त आहे. वांगचुक यांच्याबद्दल संपूर्ण देशात सहानुभूती आहे. गरज पडल्यास मी स्वतः दिल्लीला जाऊन त्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्ष पाठिंबा देणार असल्याचे त्या सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT