CJP protest : "संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली, सरकार पोरांना घाबरलंय! 56 इंच वाल्यांची हातभर..."

Sanjay Raut on cjp Parliament March : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असतानाच CJP ने रविवारी (20 जुलै) संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीही जंतर-मंतर परिसरात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जमले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिलांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Sanjay Raut | NEET Protest | Parliament March
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut reacts after Delhi Police denied permission for the NEET protest march towards Parliament, escalating the political confrontation over the alleged exam paper leak.Sarkarnama
Published on
Updated on

Parliament March : नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

राऊतांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, "सरकार पोरांना घाबरलंय! शुद्ध मराठीत सांगायचं तर ५६ इंचवाल्यांची हातभर फाटलीय. डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली. शक्य असतं तर जंतर-मंतरवरील लाखो लोकांवरही ED लावली असती. पण ते कठीण आहे. मोर्चाचा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा. ED आणि सुप्रीम कोर्टसारख्या संस्था मोदी-शहांच्या गुलाम झाल्या आहेत."

राऊत यांच्या या पोस्टमुळे दिल्लीतील आंदोलन आणि संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असतानाच CJP ने रविवारी (20 जुलै) संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

Sanjay Raut | NEET Protest | Parliament March
Parliament March : "मी आजच उपोषण सोडायला तयार..."; संसदेवरील मोर्चापूर्वीच सोनम वांगचुक यांची उपोषण मागे घेण्याची तयारी; सरकारसमोर ठेवल्या 'या' 3 अटी

तरीही जंतर-मंतर परिसरात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जमले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काही आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा करण्यात आला असून, त्यासंदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sanjay Raut | NEET Protest | Parliament March
CJP Protest : मोर्चापूर्वी जंतर-मंतरवर पोलिसांनी आणला दगडांनी भरलेले ट्रक; VIDEO शेअर करत अभिजीत दीपकेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले, "आंदोलनकर्त्यांवर..."

दरम्यान, CJPचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. "आमच्या आंदोलनातून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. संसदेकडे निघणारा मोर्चा पूर्णपणे शांततेच्या मार्गाने पार पडावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला कोणतेही गालबोट लागू देणार नाही," असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com